इंस्टाग्राम Reels साठी आता ६० सेकंदांचा व्हिडिओ करता येणार!

Instagram Reels

इंस्टाग्रामवर सध्या सर्वात लोकप्रिय गोष्ट म्हणजे रील्स. ह्या छोट्या व्हिडिओ फॉरमॅटने लोकांना वेड लावलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यासाठी करण्यात येणाऱ्या व्हिडिओची मर्यादा १५ सेकंदांवरून ३० सेकंद करण्यात आली होती. आता २७ तारखेपासून तुम्ही ६० सेकंद लांबी असलेले व्हिडिओ रील्स स्वरूपात अपलोड करू शकता!

६० सेकंदांची Reel कशी पोस्ट करायची ?

यासाठी तुम्हाला व्हिडिओ अपलोड किंवा रेकॉर्ड करण्याआधी सिलेक्ट करावी लागेल. Reels चा पर्याय निवडल्यावर उजवीकडे स्वाईप करा. त्यानंतर Down Arrow वर स्पर्श करा आणि आता Length नावाचा नवा पर्याय आलेला दिसेल. यामध्ये १५, ३० व आता ६० सेकंद उपलब्ध आहेत.

शॉर्ट व्हिडिओची टिकटॉकमुळे वाढलेली लोकप्रियता आता इंस्टाग्रामच्या Reels आणि यूट्यूबच्या शॉर्ट्सवरसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यात आता याची मर्यादा वाढवल्यामुळे आणखी काय काय पाहायला मिळेल याचा अंदाज आपणास आला असेलच… भारतात बॅन असलं तरी टिकटॉक बाहेरच्या देशांमध्ये आणखी प्रसिद्ध होत आहे. त्यांनी तर त्यांच्या व्हिडिओची मर्यादा आता ३ मिनिटांवर नेली आहे!

हा नवा बदल जाहीर करताना इंस्टाग्रामने ट्विटरवर एका मीमचा वापर केला आहे. याची चाचणी गेले काही दिवस सुरू होती आता ही सोय सर्वाना उपलब्ध झाली आहे. अजूनही नवा बदल तुमच्या फोनमध्ये दिसत नसेल तर येत्या काही दिवसात अपडेटद्वारे तो तुम्हाला दिसू लागेल.

Exit mobile version