e-RUPI सादर : कॅशलेस पेमेंटसाठी नवा एसएमएस व्हाऊचर पर्याय!

eRUPI

आज दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या सेवेची सुरुवात करण्यात आली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) यांनी DFS, NHA, MoHFW अशा सरकारी विभागांसोबत भागीदारी करून काही पार्टनर बँकासह ही सेवा विकसित केली आहे. e-RUPI हे एक QR कोड किंवा SMS मेसेज स्ट्रिंग आधारित इ व्हाऊचर असून हे मोबाइलमध्ये पाठवण्यात येईल.

e-RUPI (ई रूपी) म्हणजे काय ?

e-RUPI हे एकदा वापरता येईल असे डिजिटल व्हाऊचर आहे जे आपण कोणत्याही कार्डशिवाय, कोणत्याही पेमेंट ॲपशिवाय किंवा इंटरनेट बँकिंग शिवाय वापरू शकता. काही संस्था किंवा सरकारतर्फे निधी लाभार्थ्यांना द्यायचा असतो तेव्हा e-RUPI चा वापर करून SMS किंवा QR कोड द्वारे पाठवण्यात येतील.

ओळख पटवण्यासाठी तुमच्या मोबाइल क्रमांकाचा वापर केलेला असेल. (फोन स्मार्ट नसला तरी चालेल). ओळख पटल्यावर संबंधित बँकेला सरकार किंवा त्या त्या संस्थेकडून व्हाऊचर्स दिली जातील. ते व्हाऊचर QR कोड किंवा एसएमएस दाखवून फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळू शकेल. या अंतर्गत दिलेलं एक व्हाऊचर एकदाच वापरता येईल.

यामुळे अनुदान वाटपावेळी निधी वरून खाली येईपर्यंत होणारी गळती काही प्रमाणात का होईना थांबण्यास मदत होईल. आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, औषधे आरोग्य उपचार आणि अन्नधान्य अनुदान योजनासारख्या अनेक सरकारी व खासगी संस्थासुद्धा थेट लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी याचा वापर करणार आहेत.

सोप्या शब्दात सांगायचं तर हे काही वर्षांपूर्वी फोनसाठी ज्याप्रकारे कुपन द्वारे रीचार्ज केले जायचे तशा प्रकारचं व्हाऊचर म्हणता येईल. ठराविक रक्कम सरकार किंवा संस्थेतर्फे त्या व्हाऊचरवर जोडलेली असेल ती आपण आपला फोन घेऊन जिथे वापरायची आहे तिथे जाऊन तुमच्या फोनमध्ये आलेल्या QR/SMS कोड स्कॅन करायचा की झालं पेमेंट!

व्यवसायांना होणारा फायदा
हॉस्पिटलना होणारा फायदा
ग्राहकांना होणारा फायदा

e RUPI मध्ये सहभागी बँका : Axis Bank, Bank of Baroda, Canara Bank, HDFC Bank, ICICI Bank, Indusind Bank, Indian Bank, Kotak Bank, Punjab National Bank, State Bank of India, Union Bank of India

e-RUPI मध्ये सहभागी हॉस्पिटल्स : पुढील लिंकवर पीडीएफमध्ये पाहू शकता : https://www.npci.org.in/PDF/npci/e-rupi/live-hospitals.pdf

Search Terms : What is e rupi how to get e rupi how to redeem e rupi e rupi benefits in marathi

Exit mobile version