ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर : भन्नाट सोयींसह किंमतही जाहीर!

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली ओला (Ola) कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर काल सादर झाली असून यामध्ये S1 आणि S1 Pro असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या गाड्यांचं सध्या प्रि बुकिंग सुरू असून ८ सप्टेंबरपर्यंत विक्री आणि मग ऑक्टोबर महिन्यात याची डिलिव्हरी सुरू होईल असं सांगण्यात आलं आहे. या गाड्यांच्या निर्मितीसाठी ओलाने भारतातली सर्वात मोठी फॅक्टरी उभी केली आहे.

या स्कूटरमध्ये चक्क गाणीसुद्धा लावता येतात. मूडनुसार आवाजाचे सेटिंग्ससुद्धा बदलता येतात. आपण या गाडीच्या जवळ गेल्यावर गाडी आपोआप अनलॉक होईल. फोन्सना उत्तर देऊ शकता. मेसेज पाठवू शकता. कुणी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही अलर्ट देण्याची सोय यामध्ये आहे. इथे आपल्या मित्र किंवा कुटुंबमधील सदस्यांची प्रोफाइल सेट करून त्यांनाही याची डिजिटल चावी शेयर करता येईल. फोनद्वारे लाइट्स नियंत्रित करता येतील. या गाडीमध्ये उलट म्हणजे रिव्हर्स जाण्याचीही सोय आहे.

या स्कूटरची किंमत महाराष्ट्रात S1 साठी ९४,९९९ आणि S1 Pro साठी १,२४,९९९ अशी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही किंमत इलेक्ट्रिक गाड्यांविषयी जुन्या धोरणानुसार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या बदललेल्या धोरणानुसार ही स्कूटर भारतात सर्वात स्वस्त महाराष्ट्रात मिळेल आणि तिची किंमत S1 साठी ७४,९९९ आणि S1 Pro साठी १,०४,९९९ इतकी असू शकेल.
इतर ठिकाणी याची किंमत ९९९९९ आणि १२९९९९ अशी असेल जी FAME II सबसिडी देऊन ठरवण्यात आली आहे. ओला सध्या १०० शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स बसवणार आहे. नंतर ही संख्या ४०० शहरांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

Ola च्या दोन्ही स्कूटर्समध्ये असलेल्या सोयी : ७ इंची टचस्क्रिन, गाणी ऐकण्यासाठी स्पीकर्स, side-stand cut-off function, cruise control, hill hold assist, geo-fencing, anti-theft alert, ब्ल्युटुथ, GPS वायफाय, reverse mode, स्पीकर्स आणि नॅविगेशन, व्हॉईस असिस्टंट, MoveOS नावाची ऑपरेटिंग सिस्टम (क्रुज कंट्रोल, व्हॉईस फीचर्स S1 मध्ये नाहीत)

Ola S1 Pro स्कूटर्समध्ये असलेली सुविधा :

Ola S1 स्कूटर्समध्ये असलेली सुविधा :

या गाडीची नोंदणी सध्या book.olaelectric.com वर ४९९ रु देऊन करता येईल.

यापूर्वी Ather कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स जाहीर केल्या आहेत. तर काल ओलाने आणि त्यांच्या नंतर लगेचच Simple Energy कंपनीनेसुद्धा त्यांची २३६ किमी रेंज असलेली स्कूटर जाहीर केली आहे! यापुढे आता बऱ्याच कंपन्या यामध्ये उतरत जातील. विशेष म्हणजे भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्स, कार्सच्या निर्मितीमध्ये स्टार्टअप्सनेच पुढाकार घेतला आहे!

Exit mobile version