ॲपलचे नवे मॅकबुक प्रो सादर : आता M1 Pro & M1 Max सह!

ॲपलने आज झालेल्या कार्यक्रमात सर्वात पॉवरफुल लॅपटॉप्स सादर केले असून नवे मॅकबुक प्रो 3D ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटिंग अशा गोष्टींसाठी तर इतर लॅपटॉप्सच्या तुलनेत अनेक पटीने चांगला काम करतील. आधीच्या तुलनेत यामध्ये १३ पट अधिक वेगवान ग्राफिक्स, 3.7 पट वेगवान प्रोसेसर, नवा Liquid Retina XDR डिस्प्ले, 120Hz ProMotion चे १४ इंची किंवा १६ इंची स्क्रीन, SD Card स्लॉट, MagSafe चार्जर, नवा किबोर्ड अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे यामध्ये असलेली integrated graphics पीसी लॅपटॉप्सच्या dedicated graphics असलेल्या लॅपटॉप्सपेक्षा अधिक चांगली कामगिरी बरीच कमी बॅटरी वापरत करतो यामुळे याची बॅटरी लाईफ पूर्ण क्षमतेत सुद्धा तब्बल २१ तासांपर्यंत आहे! ॲपलच्या म्हणण्यानुसार यामधील डिस्प्ले सुद्धा जगातील सर्वोत्तम नोटबुक डिस्प्ले आहे. मात्र ॲपलने स्क्रीन वाढवली असली तरी आता फोन्सप्रमाणे यामध्येही नॉच पहायला मिळेल जो नक्कीच डिझाईनच्या दृष्टीने योग्य वाटत नाही. शिवाय या नॉचमध्ये FaceID देण्यात आलेलं नाही केवळ वेब कॅमेरा आणि इतर सेन्सरसाठीच ही जागा व्यापलेली असेल.

नव्या M1 Max मॅकबुक प्रोला तुम्ही चक्क तीन Pro Display XDR आणि एक 4K टीव्ही एकावेळी जोडू शकता आणि तरीही आपण इतर पोर्ट्स आणखी उपकरणे जोडण्यासाठी वापरू शकता! बॅटरी पॉवरवर सुद्धा हा लॅपटॉप पूर्ण क्षमतेने काम करेल जे सध्या उपलब्ध कोणतेही पीसी लॅपटॉप्स अजिबात करू शकत नाहीत असंही ॲपलने सांगितलं आहे.

यापूर्वीच्या मॅकबुकमधील टचबार नव्या मॅकबुक प्रोमध्ये काढून टाकण्यात आला असून आता यामध्ये MagSafe चार्जर, SD Card Slot, Full HDMI पोर्ट यांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. MagSafe चार्जिंग असलं तरी तुम्ही Thunderbolt 4 असलेल्या Type C पोर्ट द्वारेही चार्जिंग करू शकता.

नव्या MacBook Pro ची किंमत १४ इंची रु १,९४,९०० पासून तर १६ इंची मॉडेलची रु २,३९,९०० पासून सुरू होते!

ॲपलने लॅपटॉपसारख्या उपकरणांची क्षमता एव्हढी वाढवून ठेवली आहे की आणखी बरेच महीने कोणत्याही विंडोज आधारित लॅपटॉपला याच्या इतकी कामगिरी करणं शक्य होईल असं वाटत नाही. अगदी बऱ्याच डेस्कटॉप पीसी प्रोसेसर्सना सुद्धा नवे M1 Pro आणि M1 Max अनेक बाबतीत मागे टाकत आहेत!

याचवेळी ॲपलने AirPods 3 सुद्धा सादर केले असून यामध्ये आता नवं डिझाईन, Spacial Audio, घाम आणि पाण्यापासून संरक्षण, अधिक बॅटरी लाईफ, magsafe चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याची किंमत रु १८,५०० इतकी असणार आहे.

https://youtu.be/9tobL8U7dQo

Search Terms : Apple MacBook Pro M1 Pro M1 Max Indian Pricing

Exit mobile version