इंस्टाग्रामवर स्टोरीसाठी लिंक स्टीकर आता सर्वांना उपलब्ध!

Instagram Story Links

इंस्टाग्रामने त्यांच्या वेबसाइटवर जाहीर केलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आता लिंक्स ॲड करण्यासाठी असलेलं स्टीकर सर्वांना वापरता येणार आहे. यापूर्वी ही सोय फक्त व्हेरिफाईड हँडल्स आणि फॉलोअर्सची संख्या जास्त असलेल्यानाच उपलब्ध होती. मात्र आता सर्वच जण अशा प्रकारे स्टोरीमध्ये लिंक्स ॲड करू शकतील!

यावर्षी जूनमध्ये याची चाचणी इंस्टाग्रामने सुरू केली होती. अनेक यूजर्सच्या मागणीनंतर आता ही सोय सर्वाना देण्यात येत आहे. यापूर्वी असलेल्या Swipe Up ऐवजी हे स्टीकर आणण्यात आलं होतं.

ह्या सोयीमुळे क्रिएटर्स, व्यावसायिक आणि इतर लोक व संस्थांना माहिती शेयर करण्यासाठी लिंक स्टीकर्सचा मोठा उपयोग होईल. मात्र जर यामार्फत कोणी चुकीची माहिती वारंवार प्रसारित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अकाऊंटवर कारवाई होईल आणि त्यांच्याकडून ही सोय काढून घेतली जाईल.

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिंक कशी ॲड करायची ?

  1. तुमची इंस्टाग्राम स्टोरी इमेज अपलोड करून नेहमीप्रमाणे तयार करा.
  2. वरती मध्यभागी असलेल्या स्टीकर टुलवर टॅप करा.
  3. आता Link स्टीकर निवडा आणि लिंक जोडा व Done वर टॅप करा
  4. आता ते स्टीकर तुम्हाला स्टोरीवर कोणत्या भागात हवं आहे तिथं ठेवा आणि रंग संगती सेट करा
  5. आणि आता स्टोरी पोस्ट करा जेणेकरून तुमचे फॉलोअर्स त्यावर क्लिक करून त्या लिंकवरील माहिती वाचू शकतील.

जर अजूनही तुम्हाला हे लिंक स्टीकर उपलब्ध झालं नसेल तर आणखी काही दिवस वाट पहा. ॲप अपडेट करून ठेवा. rollout प्रक्रियेनुसार येत्या काही दिवसात तुम्हाला हे स्टीकर उपलब्ध झालेलं दिसेल.

हे स्टीकर्स जारी चांगल्या उद्देशाने सर्वांना उपलब्ध करून दिले असले तरी याचा गैरवापर जास्त होऊ शकतो असं वाटतं. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार यामधून नक्कीच थोड्या प्रमाणात का होईना वाढीस लागतील. इंस्टाग्रामने तशा प्रकारे काम करणाऱ्या अकाऊंट्सवर वेळच्यावेळी कारवाई केली तरच हे टाळणं शक्य आहे.

Exit mobile version