पोकोचा Poco M4 Pro 5G भारतात सादर : Dimensity 810 प्रोसेसर, 50MP कॅमेरा!

गेले काही दिवस सोशल मीडियामार्फत चर्चा सुरू असलेला Poco या शायोमीच्या ब्रॅंडतर्फे Poco M4 Pro हा नवा फोन आज भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 810 हा 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये 6.6 इंची LCD डिस्प्ले, 50MP+8MP कॅमेरा, सेल्फीसाठी 16MP कॅमेरा, 3.5mm Hi-res ऑडिओ जॅक, IR Blaster, 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोन वेगात चालावा यासाठी नव्याने बऱ्याच फोन्समध्ये येणारी Turbo RAM नावाची सुविधा मिळेल ज्यामुळे फोनचं स्टोरेजसुद्धा रॅम म्हणून वापरलं जाईल!

हा फोन फ्लिपकार्टवर २२ फेब्रुवारीपासून उपलब्ध होत असून यामध्ये तीन रंगांचा पर्याय आहे.

डिस्प्ले : 6.6″ FHD+ LCD Display 90Hz
प्रोसेसर : Dimensity 810
रॅम : 4GB/6GB/8GB
स्टोरेज : 64GB/128GB UFS 2.2 + Expandable Storage of Upto 1TB
कॅमेरा : 50MP Triple Camera + 8MP Ultrawide + 5MP Macro
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh (33W Fast Charging)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11 MIUI 12.5
इतर : Type C Port, side display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Power Black, Cool Blue, Poco Yellow
किंमत :
4GB+64GB ₹१४९९९
6GB+128GB ₹१६९९९
8GB+128GB ₹१८९९९

Exit mobile version