यूट्यूबर्समुळे भारताच्या GDP मध्ये ६८०० कोटींची भर : २०२० मधील आकडेवारी!

YouTube India Economy

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने यूट्यूबबद्दल जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार भारतातील यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या क्रिएटर्सनी २०२० या वर्षामध्ये तब्बल ६८०० कोटी रुपयांची भर घातली होती! ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स ही एक स्वतंत्र संस्था आहे. यूट्यूबने ६,८३,९०० जणांसाठी पूर्णवेळ नोकरी म्हणता येईल अशा पद्धतीचा स्त्रोत या मार्गाने उपलब्ध करून दिला असंही या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे.

यूट्यूब पार्टनरशिपचे स्थानिक प्रमुख अजय विद्यासागर यांनी यावेळी क्रिएटर इकॉनमी आर्थिक वाढीसाठी कारणीभूत ठरणारी एक सॉफ्ट पॉवर असण्याची क्षमता बाळगत असून यामुळे अनेकांना नोकऱ्याची निर्मिती, सांस्कृतिक प्रभाव अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. आमचे क्रिएटर्स मीडिया कंपन्याची पुढची पिढी घडवत असताना ते जागतिक प्रेक्षकांसोबत जोडले जात आहेत यामुळे त्यांचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम पुढेही वाढतच जाणार आहे.

१,००,००० हून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या चॅनल्सची संख्या भारतात आता ४०,००० च्या पुढे गेली आहे. याची वार्षिक वाढ ४५ टक्क्यांहून अधिक म्हणता येईल. अधिकाधिक भारतीय यूट्यूब मार्फत त्यांचा कंटेंट जगापुढे सादर करत आहेत.

किमान एक लाख रुपये (सहा अंकी किंवा अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या) चॅनल्सची संख्या वर्षाला ६० टक्क्यांनी वाढली आहे असं दिसून आलं आहे. यूट्यूबने उत्पन्न मिळवण्यासाठी ८ विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. उदा Adsense, SuperChat, Channel Membership, YouTube Premium Revenue

हे सर्व चित्र एकंदरीत भारतीय यूट्यूब विश्वाबद्दल असलं तरी यामधील मराठी भाषिक (मराठी भाषेत व्हिडिओ करणाऱ्या) यूट्यूबर्सची संख्या नक्कीच कमी प्रमाणात आहे. अलीकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठी चॅनल्ससुद्धा यशस्वी होत असून आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम होत आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट म्हणता येईल.

Exit mobile version