इलॉन मस्कने ट्विटर कंपनी विकत घेतली : ३,३७,००० कोटींचा व्यवहार!

twitter elon musk

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी आज जाहीर केलेल्या माहितीनुसार ट्विटर या सोशल मीडिया कंपनीला 44 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३,३७,००० कोटी रुपयांना विकत घेतलं आहे!

काही दिवसांपूर्वीच इलॉनने कंपनीचा ९ टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्यानंतर पूर्ण ट्विटरच विकत घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. तेव्हापासूनच यासाठी हालचाली होण्यास सुरुवात झाली आणि पडद्यामागे व्हिडिओ कॉल्स, गाठीभेटी होऊन आज सरतेशेवटी हा व्यवहार पूर्ण होत असल्याचं जाहीर झालं आहे.

इलॉन मस्क यांनी SpaceX, Tesla, Boring Company, OpenAI, Neuralink, PayPal अशा कंपन्याची सुरुवात केली किंवा प्रमुखपद भुषवलं असून आता ट्विटरचीही मालकी मिळवली आहे.

अनेकांचा या अधिग्रहणाला विरोधसुद्धा झाला असून पैशांचं वजन वापरुन हा व्यवहार जबरदस्तीने पार पाडला जात असल्याचंही अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. या निमित्ताने इलॉनच्या राजकीय भूमिकांमुळे टोकाचा विरोध आणि समर्थनसुद्धा होत आहे.

इलॉनने व्यवहार पूर्ण झाल्यावर ‘माझे टिकाकारसुद्धा ट्विटरवर रहावेत कारण हाच मतस्वातंत्र्याचा अर्थ आहे.’ असं ट्विट केलं आहे.

यापूर्वी केलेल्या विविध ट्विटसनुसार जर ट्विटर विकत घेतलं तर एडिट बटन, बॉटस बंद करण्यावर उपाय, सर्वांना मतस्वातंत्र्य (free speech) देणार असं सांगितलं होतं.

आता यानंतर ट्विटरच्या सीईपदी कोण राहणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच पराग अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Exit mobile version