वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसने काल झालेल्या कार्यक्रमात त्यांचे २ नवे स्मार्टफोन आणले असून यासोबत OnePlus Nord Buds सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. OnePlus 10R मध्ये असलेलं 150W चार्जिंग सर्वात वेगवान चार्जिंग असलेलं असून हा फोन ५ मिनिटात ५०% चार्ज होतो!

OnePlus Nord CE 2 Lite या फोनमध्ये 6.59-inch Full HD+ IPS LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 695 प्रोसेसर, 6GB/8GB रॅम, 128GB स्टोरेज, 64MP+2MP+2MP असा ट्रिपल कॅमेरा सेटप, 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 33W चं फास्ट चार्जिंग, 3.5mm ऑडिओ जॅक, OxygenOS 12.1 देण्यात आलं आहे. या फोनची किंमत १९,९९९ (6GB+128GB) आणि २१,९९९ (8GB+128GB) अशी असून हा फोन ३० एप्रिल पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

OnePlus 10R या फोनमध्ये 6.7-inch Full HD+ Fluid AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, Mediatek Dimensity 8100 max प्रोसेसर, 8GB/12GB रॅम, 128GB/256GB स्टोरेज, 50MP main + 8MP Ultrawide + 2MP Macro असा ट्रिपल कॅमेरा सेटप, 16MP फ्रंट कॅमेरा, 4500mAh बॅटरी, 150W चं फास्ट चार्जिंग, OxygenOS 12.1 देण्यात आलं आहे. या फोनची किंमत ३८,९९९ (8GB+128GB 80W), ४२,९९९ (12GB+256GB 80W), ४३,९९९ (8GB+256GB 150W) अशी असून हा फोन ४ मे पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

या फोनमध्ये देण्यात आलेलं 150W चं चार्जिंग सध्या उपलब्ध फोन्समध्ये सर्वात वेगवान चार्जिंग आहे. अवघ्या ५ मिनिटात हा फोन ५०% चार्ज होतो! हीच सोय आता realme GT Neo 3 मध्येही देण्यात आली आहे. दोन्ही फोन्स बऱ्यापैकी सारखेच असल्याचंही सांगण्यात येत आहे.

OnePlus Nord Buds : वनप्लसने नॉर्ड ब्रॅंड अंतर्गत त्यांचे नवे इयरबडस Nord Buds सादर केले असून यामध्ये AI Noise Cancelling दिलेलं आहे. शिवाय 12.4mm Titanium drivers, Dolby Atmos, IP55 water and sweat resistance, Bluetooth 5.2 अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याची बॅटरी लाईफ ७ तासांची असून बॅटरी केससह ३० तासांची बॅटरी लाईफ देऊ शकेल. याची किंमत २७९९ असून १० मेपासून खरेदी करता येईल!

Exit mobile version