गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

गूगल मॅप्स अंतर्गत उपलब्ध असलेली गूगल स्ट्रीट व्ह्यू (Google Street View) ही सेवा आपल्याला जगभरातील विविध शहरांचे रस्ते 360° पॅनोरामाद्वारे घरबसल्या फिरण्याचा अनुभव देते. यापूर्वी २०११ मध्ये ही सेवा सादर झाली होती मात्र त्यानंतर गूगलला सुरक्षेच्या कारणामुळे परवानगी नसल्याने ही सेवा भारतात सुरू करता आली नाही. आता त्यांनी Genesys आणि महिंद्रा या भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी करून ही सेवा १० भारतीय शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

Image Source TechCrunch

या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर तर देशभरातील बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, वडोदरा आणि अमृतसर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

या दहा शहरांमधील १,५०,००० किमी रस्ता 360° पॅनोरामाद्वारे पाहू शकता. या वर्षा अखेरीस ५० शहरे गूगल स्ट्रीट व्ह्यूवर आणणार असल्याचं गूगल इंडियाने सांगितलं आहे. यासाठी महिंद्रा त्यांच्या कॅमेरा बसवलेल्या SUV देणार आहे.

गूगल स्ट्रीट व्ह्यू कसं वापरायचं

  1. ठिकाणाचं नाव गूगल मॅप्समध्ये सर्च करा

  2. उजव्या कोपऱ्यात असलेल्या पिवळ्या रंगाच्या आयकॉनला हव्या असलेल्या ठिकाणी ड्रॉप करा.


  3. जर फोनवर पाहत असाल तर ठिकाणाच्या मार्करवर जा आणि नंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या Layers चिन्हावर जाऊन Street View सिलेक्ट करा.

  4. उपलब्ध दिशा दाखवणारे मोठे बाण दिसतील त्यांवर क्लिक करून आजूबाजूचा परिसर पाहू शकता.

२०२१ मधील National Geospatial Policy नुसार भारतात अशा प्रकारचा डेटा गोळा करून तो भारतातच साठवून तो वापरण्याची परवानगी इतर कंपन्यांना देता येईल.

यासोबत गूगल आता स्पीड लिमिट्ससुद्धा दाखवण्यास सुरुवात करत आहे. तूर्तास ही सोय फक्त बेंगळुरू आणि चंडीगढमध्येच उपलब्ध होईल.

गूगलने स्ट्रीट व्ह्यू जाहीर केल्यावर काही वेळातच भारतीय कंपनी मॅप माय इंडियाने सुद्धा त्यांची स्वतःची स्ट्रीट व्ह्यू सेवा जाहीर केली आहे. या सेवेचं नाव Mappls RealView असं असणार आहे. ही सेवा Mappls.com वर उपलब्ध असेल.

Search Terms : Google Street View India How to use Street View

Exit mobile version