ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

ॲपलने काही दिवसांपूर्वी (१७ जानेवारी) त्यांचे सर्वात पॉवरफुल लॅपटॉप्स सादर केले असून नवे मॅकबुक प्रो 3D ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटिंग, मशीन लर्निंग अशा गोष्टींसाठी तर इतर लॅपटॉप्सच्या तुलनेत अनेक पटीने चांगला काम करतील. या मॅकबुकमध्ये आजवरची सर्वाधिक बॅटरी लाईफ आणि सर्वोत्तम डिस्प्ले मिळेल! यामध्ये याच दिवशी सादर झालेले M2 Pro आणि M2 Max हे दोन नवे प्रोसेसर पर्याय देण्यात आले आहेत.

यासोबत नवा स्वस्त कॉम्प्युटर मॅक मिनी (जो आपण कोणत्याही मॉनिटरला जोडून वापरू शकतो) आणला आहे आणि याची किंमतसुद्धा कमी म्हणजे ५९९०० पासून सुरू होते! यामध्ये M2 आणि M2 Pro या प्रोसेसर्सचा पर्याय मिळेल.

नव्या मॅक मिनीमध्ये 32GB पर्यंत रॅम, 8TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. M2 Pro असलेल्या मॅक मिनीमध्ये २ Type C पोर्ट जास्त देण्यात आले आहेत. शिवाय 10GB Ethernet चा पर्याय आहे. याला तुम्ही तीन मॉनिटर एकावेळी जोडू शकता! यामध्ये चक्क 8K व्हिडिओसुद्धा प्ले करता येईल! ॲपलचा कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी हा खरोखर एक चांगला पर्याय आहे कारण विंडोज लॅपटॉप्सच्या तुलनेत किंमतीच्या मानाने हा नक्कीच खूप पॉवरफुल आहे.

8-Core CPU, 10-Core GPU, 8GB Memory, 256GB Storage किंमत ५९९००
8-Core CPU, 10-Core GPU, 8GB Memory, 512GB Storage किंमत ७९९००
10-Core CPU, 16-Core GPU, 16GB Memory, 512GB Storage किंमत १२९९००

आधीच्या नवा आणि त्यांचा सर्वोत्तम Liquid Retina XDR डिस्प्ले, M2 Pro आणि M2 Max चा पर्याय, 120Hz ProMotion चे १४ इंची किंवा १६ इंची स्क्रीन, SD Card स्लॉट, MagSafe 3 चार्जर, हेडफोन जॅक, तीन Thunderbolt 4 पोर्ट्स अशा सुविधा देण्यात आल्या आहेत, २२ तासांची सर्वाधिक बॅटरी लाईफ, 96GB पर्यंत रॅम आणि 8TB पर्यंत स्टोरेजचा पर्याय.

M2 Pro & 14″ Display : 10-Core CPU, 16-Core GPU, 16GB Memory, 512GB SSD Storage किंमत १,९९,९००
M2 Max & 14″ Display : 12-Core CPU, 30-Core GPU, 32GB Memory, 1TB SSD Storage किंमत ३,०९,९००
M2 Pro & 16″ Display : 12-Core CPU, 19-Core GPU, 16GB Memory, 512GB SSD Storage किंमत २,४९,९००
M2 Max & 16″ Display : 12-Core CPU, 38-Core GPU, 32GB Memory, 1TB SSD Storage किंमत ३,४९,९००

Exit mobile version