नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

आज आपण ॲपलच्या मॅकबुक, आयमॅकवर मराठीत टायपिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. macOS Ventura या नव्या मॅकओएसमध्ये ही सोय देण्यात आली असून याद्वारे Transliteration पद्धतीने मराठी भाषेत टाइप करता येईल!

Transliteration मुळे टाइप करत असलेल्या शब्दांचं इंग्रजी स्पेलिंग लिहिलं की शब्द मराठीत टाइप होतो! उदा. तुम्ही या किबोर्डवर maharashtra असं स्पेलिंग टाइप केलं की महाराष्ट्र असं टाइप झालेलं दिसेल! यामुळे मराठीत टाइप करण्याचा वेग बऱ्याच पटीत वाढतो कारण आपल्याला कोणतं मराठी अक्षर कुठे आहे हे किबोर्डवर शोधत बसावं नाही.

सर्वात आधी तुमचा मॅकमध्ये नवी macOS Ventura इंस्टॉल केली आहे का ते पहा. त्यानंतर पुढील प्रमाणे कृती करा.

  1. सेटिंग्स मध्ये जा
  2. त्यानंतर Keyboard
  3. आता Text Input मधील Edit वर क्लिक करा.
  4. आता डाव्या कोपऱ्यात खाली + चिन्हावर क्लिक करा
  5. आलेल्या यादीत marathi सर्च करा.
  6. आता Marathi Transliteration A-अ हा पर्याय सिलेक्ट करा आणि Add वर क्लिक करा.
  7. आता तुम्ही मराठी भाषेत टाइप करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

Search Terms : Apple MacBook Marathi Typing Marathi Fonts Keyboard macOS Ventura

Exit mobile version