ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!

ॲपलच्या मॅक डिव्हाईसेसवर उपलब्ध असलेले फायनल कट प्रो आणि लॉजिक प्रो हे लोकप्रिय सॉफ्टवेअर आता आयपॅडवरसुद्धा वापरता येणार आहेत. काल ॲपलने याची अधिकृत घोषणा केली आहे. Final Cut Pro हे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर असून Logic Pro हे एक ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. २३ मेपासून हे दोन्ही ॲप्स डाउनलोड करता येतील!

Final Cut Pro हे ॲप 12.9-inch iPad Pro (5th or 6th generation), 11‑inch iPad Pro (3rd or 4th generation), or iPad Air (5th generation) या आयपॅडवर iPadOS 16.4 or later इंस्टॉल केली असेल तर वापरता येईल. थोडक्यात M1 चिप असलेले आयपॅड आणि त्यानंतर आलेले किंवा येणारे आयपॅड यांवरच हे वापरता येईल.

Logic Pro हे ॲप A12 Bionic चिप असलेल्या व त्यानंतर आलेल्या आयपॅड्स वर वापरता येईल.

Final Cut Pro आणि Logic Pro यांची प्रत्येकी किंमत दरमहा $4.99 किंवा वार्षिक $49 इतकी आहे. मॅकवर याच सॉफ्टवेअरसाठी एकदाच पैसे देऊन खरेदी करण्याचा पर्याय आहे मात्र आयपॅडला दर महिन्याला पैसे म्हणजेच Subscription घ्यावं लागणार आहे. एक महिना मोफत ट्रायल घेता येईल.

Final Cut Pro for iPad Features

Logic Pro iPad Features

Exit mobile version