ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

ॲपलने आज त्यांचे नवीन मॅकबुक प्रो आणि iMac सादर केले असून आता यामध्ये त्यांच्या नव्या M3 प्रोसेसरचा समावेश असेल. M3 प्रोसेसरमध्येही M3, M3 Pro आणि M3 Max असे पर्याय असतील. या कार्यक्रमाला त्यांनी Scary Fast असं नाव दिलं होतं कारण यंदाचा हा कार्यक्रम काही देशांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या हॅलोवीनच्या पार्श्वभूमीवर आला आहे.

M1 प्रोसेसरच्या तुलनेत नवे M3 चिप ६० टक्क्याहून अधिक चांगली कामगिरी करू शकतात असं ॲपलने सांगितलं आहे.

नव्या MacBook Pro मध्ये XDR Liquid Retina Display, 8TB पर्यंतचे स्टोरेज पर्याय, 128GB पर्यंतचे रॅम पर्याय, M3/M3 Pro/M3 Max प्रोसेसर, 16 Core CPU पर्याय, 40 Core GPU पर्याय, WiFi 6E, Bluetooth 5.3, Six Speaker Sound System, MagSafe 3, Hardware Accelerated Ray Tracing आणि जवळपास २२ तासांची बॅटरी लाईफ मिळेल. याची भारतातली किंमत १,६९,९०० (8Core+10Core+8GB+512GB) पासून सुरू होते. M1 iMac च्या तुलनेत हा याची कामगिरी दुपटीने चांगली आहे.
विविध मॉडेल्सच्या किंमती : 14” M3: ₹1,69,900, 14” M3 Pro: ₹1,99,900, 14” M3 Max: ₹3,19,900, 16” M3 Pro: ₹2,49,900, 16” M3 Max: ₹3,49,900

नव्या iMac मध्ये 4.5K Retina Display, 2TB पर्यंतचे स्टोरेज पर्याय, 24GB पर्यंतचे रॅम पर्याय, M3 प्रोसेसर, WiFi 6E, Bluetooth 5.3, Six Speaker Sound System मिळेल. याची भारतातली किंमत १,३४,९०० (8Core+8Core+8GB+256GB) पासून सुरू होते. M1 iMac च्या तुलनेत हा याची कामगिरी दुपटीने चांगली आहे

काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या माहितीनुसार ॲपलचं भारतातलं या आर्थिक वर्षातलं (FY23) उत्पन्न ५०,००० कोटींवर पोहोचलं आहे. निव्वळ नफासुद्धा ७६ टक्क्यांनी वाढला आहे!

Exit mobile version