सॅमसंगचा Galaxy S23 FE सादर : सोबत Tab S9 FE व Buds FE

अनेक दिवस चर्चा सुरू असलेला सॅमसंगच्या फ्लॅगशिप S23 सिरीजमधील फॅन एडिशन फोन Galaxy S23 FE काल भारतात सादर झाला आहे. यापूर्वीच्या S21FE नंतर थेट S23FE बाजारात येणार आहे. नव्या प्रोसेसरसह नवी किंमतसुद्धा आली आहे. या फोनसोबत Tab S9 FE हा टॅब्लेट आणि Buds FE हे इयरफोन्ससुद्धा सादर झाले आहेत.

या फोनमध्ये Exynos 2200 प्रोसेसर, 6.4″ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले, 50MP+12MP+8MP असा मुख्य कॅमेरा आणि 10MP चा फ्रंट कॅमेरा, 8GB रॅम, 256GB स्टोरेज, 4500mAh बॅटरी, फक्त 25W चं फास्ट चार्जिंग, IP68, WiFi6E अशा सोयी मिळणार आहेत.

या फोनची किंमत ५९९९९ ठेवण्यात आली असून सध्याच्या फोन्सच्या तुलनेत खूपच जास्त आहे. शिवाय बाकीच्या देशांत Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर असताना भारतात मात्र Exynos प्रोसेसर देण्यात आला आहे. यावर मिळणारी HDFC ग्राहकांना मिळणारी १०००० सूट धरली तरीही हा फोन महागच वाटेल. लवकरच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज आणि Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होत आहे त्यामध्ये यापेक्षा चांगले फोन्स कमी किंमतीत मिळतील!

डिस्प्ले : 6.74″ FHD+ Dyanamic AMOLED 2X display 120Hz refresh rate, HDR10+
प्रोसेसर : Exynos 2200
रॅम : 8GB
कॅमेरा : 50MP+12MP+8MP
फ्रंट कॅमेरा : 10MP
बॅटरी : 4500mAh 25 watt wired
ऑपरेटिंग सिस्टम : Android 13 OneUI 5.1
इतर : In-display fingerprint scanner, 5G, Bluetooth 5.3, NFC, WiFi6E, IP68 water resistance
किंमत :
8GB+128GB ₹59999
8GB+256GB ₹64999

Tab S9 FE मध्ये 10.9″ LCD डिस्प्ले, Exynos 1380 प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB स्टोरेज (1TB पर्यंत वाढवता येईल), 8MP कॅमेरा, 12MP Ultrawide फ्रंट कॅमेरा, 8000mAh बॅटरी, AKG with Dolby Atmos, 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.3 अशा सोयी मिळतील. याची किंमत ३६९९९ पासून सुरू होते यामध्ये आणखी एक मॉडेल मिळत असून Tab S9 FE+ ची किंमत ४६९९९ इतकी आहे.

Galaxy Buds FE मध्ये Active Noise Cancellation (ANC), AI-powered Deep Neutral Network (DNN), up to 30 hours playback time, Bluetooth 5.2, AAC SBC audio codecs असे फीचर्स आहेत. याची किंमत ९९९९ असून सेलमध्ये हा ७९९९ पर्यंत मिळू शकेल.

Exit mobile version