Redmi Note 13 सिरिजचे स्मार्टफोन्स सादर : किंमत १८९९९ पासून सुरू!

शायोमीने आज झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या Redmi Note मालिकेतील स्मार्टफोन्स सादर केले असून यामध्ये Redmi Note 13, 13 Pro आणि 13 Pro+ चा समावेश आहे. यांच्या किंमती अनुक्रमे १८९९९, २५९९९ आणि ३१९९९ पासून सुरू होतात! Note 13 मध्ये Dimensity 6080, Note 13 Pro मध्ये Snapdragon 7s Gen 2 आणि Note 13 Pro+ मध्ये Dimensity 7200 Ultra हे प्रोसेसर जोडले आहेत. हे फोन्स १० जानेवारीपासून खरेदी करता येतील.

Redmi Note 13 : 6.67 इंची FHD+ 120Hz AMOLED डिस्प्ले, 1000 nits peak brightness, Gorilla Glass 5, MediaTek Dimensity 6080, 108MP Main + 2 MP Depth sensor आणि 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 33W wired charging, MIUI 14 (Android 13), Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB 2.0 Type-C, 3.5mm Audio Jack
किंमत : 6GB+128GB: ₹18,999, 8GB+256GB: ₹20,999, 12GB+256GB: ₹22,999

Redmi Note 13 Pro : 6.67 इंची 1.5k 120Hz AMOLED डिस्प्ले, 1800 nits peak brightness, Gorilla Glass Victus, Snapdragon 7s Gen 2, 200MP Main + 8MP Ultrawide + 2 MP Macro आणि 16MP फ्रंट कॅमेरा, 5100mAh बॅटरी, 67W wired charging, MIUI 14 (Android 13), Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB 2.0 Type-C, 3.5mm Audio Jack
किंमत : 8GB+128GB: ₹25,999, 8GB+256GB: ₹27,999, 12GB+256GB: ₹29,999

Redmi Note 13 Pro+ : 6.67 इंची 1.5k 120Hz AMOLED Curved डिस्प्ले, 1800 nits peak brightness, Gorilla Glass Victus, MediaTek Dimensity 7200 Ultra, 200MP Main + 2 MP Depth sensor आणि 16MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 120W wired charging, MIUI 14 (Android 13), Wi-Fi 6, Bluetooth 5.3, USB 2.0 Type-C, NFC, IP68
किंमत : 8GB+256GB: ₹31,999, 12GB+256GB: ₹33,999, 12GB+512GB: ₹35,999

Redmi Note 13 Pro आणि Pro + फ्लिपकार्टवर आणि Redmi Note 13 अॅमेझॉनवर मिळेल. प्रो मॉडेलवर २००० ची अधिक सूट मिळेल आणि Note 13 वर १००० ची सूट मिळेल.

Exit mobile version