आता गूगल पे SoundPod उपलब्ध : UPI पेमेंट अलर्ट्ससाठी नवा पर्याय!

गूगल पे ने भारतात त्यांचा स्वतःचा SoungPod उपलब्ध करून दिला असून याद्वारे दुकानदार/व्यावसायिक UPI पेमेंट्स स्वीकारल्यानंतर त्याबद्दल ऑडिओ नोटिफिकेशन ऐकू शकतात. जवळपास वर्षभर काही ठराविक ठिकाणी याची चाचणी केल्यानंतर गूगल इंडियाने त्यांचं हे उत्पादन आता सर्वांसाठी उपलब्ध केलं आहे.

Google Pay SoundPod बद्दल अधिकृत माहिती : https://support.google.com/pay-offline-merchants/answer/14011657?hl=mr

सध्या बाजारात Paytm Soundbox, PhonePe SmartSpeaker, mSwipe Soundbox, BharatPe Speaker असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडेचे Paytm वर RBI ने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या ग्राहकांना बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे नेमकी हीच वेळ साधत गूगलने त्यांचा SoundPod आणला आहे.

या SoundPod मध्ये एक छोटा LCD डिस्प्ले, एक स्पीकर, 4G Network आहे. यामधील नोटिफिकेशन भाषेसाठी मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, गुजराती, कन्नड आणि इंग्लिशचा पर्याय आहे.

याचे प्लॅन्स खालील प्रमाणे असतील.

अधिक माहितीसाठी वर दिलेल्या लिंकवर जाऊ शकता किंवा 18003097597 या फोन क्रमांकावर संपर्क साधा.

Exit mobile version