गुगलचा शानदार नेक्सस-7 टॅब भारतात दाखल

PHOTOS: गुगलचा शानदार नेक्सस-7 टॅब भारतात दाखल

यंदाच्या दिवाळीला तुम्ही नवा टॅब खरेदी करण्‍याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. गुगलचा नेक्सस- 7 टॅब्लेट आज भारतीय बाजारात दाखल झाला आहे. नेक्सस- 7 सध्या आयपॅडला टक्कर देत आहे. यूरोपमध्ये नेक्सस-7ला आयपॅडच्या तुलनेत मोठी मागणी आहे.

निर्माता कंपनी ‘असूस’नुसार यूरोपमध्ये प्रत्येक महिन्याला 10 लाख नेक्सस-7 टॅब विक्री होत आहेत. भारतीय बाजारात ‘नेक्सस- 7’ ची किंमत जवळपास 20 हजार रूपये इतकी असेल. हा टॅब टाटाच्या क्रोमा इलेक्ट्रॉनिक स्टोअर्ससोबत अन्य रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. अँड्रॉइडच्या अत्याधुनिक व्हर्जनसोबत नेक्सस-7 मध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत.

गुगलचा नेक्सस-7 टॅबची ‍स्क्रीन 7 इंचाची असून 1280*800 इतके रिझोल्यूशन आहे.नेक्सस-7 टॅबमध्ये अँड्रॉईड जॅलीबीन ऑपरेटिंग सिस्टिम, 1.2 Ghz चे एन-व्हिडिया टिएग्रा तीन प्रोसेसर, 1 GB ची रॅम 
8GB ची इंटरनल मेमोरी असून 16 GB पर्यंत ती वाढविता येईल. 32 GB मेमोरी असलेला टॅबही लवकरच लॉन्च होणार आहे.कॅमेरा- 1.2 मेगापिक्सलर् NFC, वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. 4325 एमएएचची बॅटरी. 340 ग्रॅम वजन

Exit mobile version