टॅबलेटसाठी भारत मोठी बाजारपेठ || — स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त

PICS: हे आहेत आपल्‍या बजेटमध्‍ये बसणारे टॅबलेट

टॅबलेटसाठी भारत आता मोठी बाजारपेठ बनला आहे. अ‍ॅपलच्‍या हायएंड टॅबपासून भारतीय कंपन्‍यांच्‍या कमी किंमतीचे टॅबलेटस बाजारपेठेत मोठयाप्रमाणात विकले जात आहेत. मात्र, या बाजारपेठेत स्‍वस्‍त टॅबलेटची विक्री सर्वात जास्‍त होते. त्‍यामुळे मोठयामोठया कंपन्‍यांनादेखील आपल्‍या मार्केटिंग स्‍ट्रेटजीमध्‍ये बदल करावा लागत आहे. आज 15 हजारांपेक्षा कमी किंमतीचे एक डझनहून अधिक टॅब बाजारात उपलब्‍ध आहेत. 

मायक्रोमॅक्‍स फनबुक-
मायक्रोमॅक्‍स फनबुक हा एक उत्‍कृष्‍ट टॅबलेट आहे. फनबुक अँडाएड आयसीएसवर काम करतो. विद्यार्थ्‍यांना समोर ठेऊन हा टॅबलेट तयार करण्‍यात आला असून बाजारात तो 6,500 रूपयांत उपलब्‍ध आहे.
की फीचर्स- 7 इंच कॅपिसेटिव्‍ह, 800×480 पिक्‍सल, 3जी डोंगल via USB. (only supports TATA Photon dongle and Wi-Fi), USB 2.0 (micro), 0.3 MP VGA कॅमेरा, 4 जीबी इंटर्नल मेमरी, 32 जीबीपर्यंत एक्‍सापंडेबल.

HCL ME Y2 टॅबलेट-     
3जी सुविधांनी युक्‍त या टॅबलेटची किंमत 14,999 रूपये इतकी आहे. 7 इंचाची मल्‍टीटच कॅपेसिटिव्‍ह स्‍क्रीनच्‍या ME Y2 अँड्राएड आइसक्रीम सँडविचवर काम करेल. यामध्‍ये 2 मेगापिक्‍सलचा कॅमेरा आणि एक व्‍हीजीए कॅमेरा लावण्‍यात आला आहे. या स्‍क्रीनची 1024×600 इतकी रिझोल्‍यूशन आहे.
हा नवा टॅब Cortex A9 1GHz प्रोसेसरवर काम करतो. आणि यामध्‍ये 1 जीबी रॅम लावण्‍यात आले आहे. ME Y2 8GB इंटर्नल स्‍टोरेजबरोबर वाढवता येऊ शकते.
HCL ME Y2 मध्‍ये mini-USB आणि mini HDMI पोर्टचीही सुविधा देण्‍यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी                  यामध्‍ये Wi-Fi, 3जी आणि Bluetoothची देखील सुविधा देण्‍यात आली आहे.

आयबेरी BT 07i/ आयबेरी BT 07i (लिमिटेड एडिशन) –
मार्चमध्‍ये लॉंच झालेला हा टॅबलेट या कॅटेगरीमधील सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी करणारा आहे. पहिल्‍यांदा आयबेरी Bt 07i टॅब लॉंच करण्‍यात आला. तो यशस्‍वी झाल्‍यानंतर त्‍याची लिमिटेड एडिशनही लॉंच करण्‍यात आली. त्‍याची किंमत साधारणात: 8 हजार रूपये इतकी आहे.
की फिचर्स– 7 इंच कॅपेसिटिव्‍ह 800×480 WXGA TFT LED, 3G, Wi-Fi कनेक्टिव्हिटी, 0.3 एमपी फ्रंट कॅमेरा, Mini USB OTG, 4 GB इंटर्नल मेमरी, 32 जीबीपर्यंत एक्‍सपाडेंबल. 

 स्‍वाईप ऑल इन वन–
स्‍वाईप ऑल इन वनमध्‍ये फुल एचडी 7 इंचाची TFT LCD स्‍क्रीन कॅपे‍सिटिव्‍ह 5 पॉंईट मल्‍टीटच स्‍क्रीन देण्‍यात आली आहे. याच्‍या स्‍क्रीनची रिझोल्‍शून 1028×768 पिक्‍सल इतके आहे. हा टॅब अँड्राएड 4.0.3 आईसक्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्‍टमवर काम करतो.
याला 2 मेगापिक्‍सलचा रिअर आणि 1.3 मेगापिक्‍सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याची रॅम 1 जीबी आणि त्‍याची इनबिल्‍ट मेमरी 8 जीबीइतकी आहे. आणि ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. कने‍क्टिव्हिटीसाठी वायफाय, 3जी, ब्‍ल्‍यूटूथ 3.0 उपलब्‍ध आहे. याची जीपीएस प्रणाली व्‍हॉयस बेस्‍ट नेव्हिगेशनने युक्‍त आहे. स्‍वाईप ऑल इन वनमध्‍ये आपल्‍याला एफएम रेडिओ, ऑलिव्‍ह ऑफिस प्रीमियम, ई-बुक रिडर, ऑडिओ रे‍कॉर्डिंगशिवाय एचडी आणि 3डी गेम्‍सचीही सुविधा आहे. याची बॅटरी 4,000 mAh इतकी आहे.

कार्बन स्‍मार्ट टॅब 1-
यावर्षी कार्बनने टॅबलेटच्‍या दुनियेत आपले पाऊल ठेवले. अँड्राएड आयसीएसवर चालणा-या 1.2 GHZ Xburst प्रोसेसरची सुविधा आहे. याची किंमत 7,990 इतकी आहे.
की फीचर्स- 7 इंचाची कॅपेसिटिव्‍ह टचस्‍क्रीन 800×480 चे रिझोल्‍यशून, कनेक्‍टिव्हिटीसाठी 3जी डोंगल, वाय-फाय, GPS, USB 2.0, 2 MP फ्रंट कॅमेरा, 1 जीबी इंटर्नल मेमरी, 32 जीबीपर्यंत ते वाढवण्‍यात येते.
विशटेल इरा थिंग (Wishtel Ira Thing2)-
विशटेलचा Ira Thing 2 अँड्राएड 1.5 GHz चा प्रोसेसरवर चालतो. खास भारतीय युजरसाठी या टॅबलेटची किंमत सुमारे 6,500 इतकी आहे.
की फीचर्स- 7 इंचाची कॅपेसिटिव्‍ह  800×480 पिक्‍सल स्‍क्रीन, 3G, USB 2.0 (micro), 1.3 MP कॅमेरा, 4GB इंटर्नल मेमरी, 32GB पर्यंत एक्‍सपांडेबल करता येते. GPS with A-GPS.
टीप : हि सर्व उपकरणे दिव्य मराठीच्या लेखकांनी suggest केली आहेत मराठीटेक त्याची जबाबदारी गहू शकत नाही .

।।।————-          दिव्य मराठी  
Exit mobile version