पीसीचे टॅब्लेटमध्ये रूपांतर करणारे सोनीचे अल्ट्राबुक

सोनी इंडिया या आघाडीच्या कंपनीने नव्या पिढीचा हायब्रीड अल्ट्राबुक पीसी ‘व्हायो ड्युओ 11’ बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. हा पीसी डिसेंबरच्या अखेरीस सर्वत्र उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यातील सर्फ स्लायडर डिझाइनमुळे प्रवासात असताना त्याचे टॅब्लेट किंवा पीसीमध्ये रूपांतर करता येऊ शकते.  
संगीत आणि व्हिडिओजचा आनंदही घेताना की बोर्ड बाजूला घेऊन अत्याधुनिक अशा इंटेल कोअर प्रोसेसरद्वारे तुम्ही याचा पीसीसारखा उपयोग करू शकता. 
‘व्हायो ड्युओ 11’ मध्ये आकर्षक टच आणि हस्ताक्षराचे इंटरफेस असून त्यामुळे विंडोज 8 चा चांगला अनुभव मिळतो. यामध्ये टायपिंग, मीडिया अ‍ॅप्लिकेशन्स, टच कॅपेबल, सुपर ब्राइट फूल एचडी ऑप्टिकाँट्रास्ट पॅनल असल्याने सोपे होते. यामुळे आपल्याला हाताने थेट लिहीत असल्याचा आनंद टच स्क्रीनवर मिळतो. मग आता नोंदी करा, आकृत्या काढा किंवा तुमच्या सादरीकरणात काही गोष्टींचा समावेश करा व सोप्या पद्धतीने या कॉम्प्युटरचा उपयोग करा. 
स्मार्ट टेक्स्ट रेकग्निशनमुळे तुम्ही हाताने लिहिलेल्या गोष्टीही सहजपणे साठवून ठेवू वा शोधूही शकता. यातील सुपर ब्राइट 29.4 सेंमी (11.6 इंच) एचडी ऑप्टिकॅँट्रास्ट पॅनलमुळे तुम्ही फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करू शकता.  तुमचे मित्र किंवा कुटुंबीय डिटेल्ड पॅक्ड, ठळक असे फोटो वाइड ह्युइंग अँगलने दिवसाच्या उजेडातही ठळकपणे पाहू शकता.   
क्विक बूटमुळे हा कॉम्प्युटर काही सेकंदातच सुरू होतो. ज्या वेळी पीसीला ब्रेक हवा असतो त्या वेळी हा व्हायो आपली डीप एनर्जी सेव्हिंग स्लीप मोडमध्ये जातो. परिणामी तुमचे डॉक्युमेंट्स सुरक्षित राहतात.
यामध्ये पर्यायी शीट टाइप बॅटरीमुळे तुमच्या बॅटरीचे अधिक आयुष्य राहते. आकार सडपातळ असूनही वायो ड्युओ 11 मध्ये फूल कॉम्पोनंट पोटर्स आणि इंटरफेसेस आहेत. यात ब्ल्यू टूथ स्मार्ट रेडी, यूएसबी 3.0, यूएसबी स्लीप चार्ज यांचा समावेश असून यातील यूएसबी स्लीप चार्जच्या उपयोगातून तुम्ही मोबाइल्स किंवा म्युझिक प्लेअर प्रवास करताना चार्ज करू शकता.
विशेष म्हणजे हे सर्व पीसी बंद असतानाही करता येते. एचडीएमआय, इंटरनेट आणि व्हिडिओ पोर्ट्सही यामध्ये आहेत. प्रोजेक्टर किंवा सेकंडरी स्क्रीन करता एक्स्ट्रा डोंगल किंवा अ‍ॅडॅप्टर्स लावण्याची गरज नाही. हे सर्व बोर्डवर उपलब्ध आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये :  
सर्फस्लायडर डिझाइनमुळे फूल फंक्शन अल्ट्राबुक पीसी आता प्रवास करत असताना टॅब्लेट मोडमध्ये बदलू शकता.    
सडपातळ आणि हलके अंदाजे 1.3 किलो आणि 17.85 मिमी सडपातळ 
29.4 सेंमी (11.6 इंच) रुंद आणि फूल एचडी टच स्क्रीन  
आरामदायक आणि अचूक हाताने लिहिण्याचा आनंद  
डिजिटल नॉइज कॅन्सलेशनसह हेडफोन्सची सुविधा  
Exit mobile version