अंघोळ करतानाही बिनधास्त वापरा मोबाइल

Water-resistant and dust-resistant, the Xperia Z smartphone is tough and sleek.अँड्रॉईड, स्मार्ट फोनची सध्या चांगलीच चलती आहे. सतत जवळ असणारा हा मोबाइल कधी पाण्याच्या संपर्कात आला तर मात्र कायमचा बंद पडतो. त्यामुळे अंघोळ करताना महत्वाचा फोन आला किंवा भर पावसात आपण मोबाइल उचलणे वापरणे टाळतो. मात्र आता ही चिंता करण्याचे कारण नाही. अंघोळ करताना देखिल तुम्ही मोबाइल वापरू शकाल.


सोनी कंपनीने आता वॉटरप्रुफ मोबाईल बाजारात आणल्याने आता या अडचणी कमी होणार आहेत. अमेरीकेतील लासवेगास येथे सुरु असणा-या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (सीइएस)मध्ये सोनीने आपल्या एक्सपीरीया सिरीजमधील पुढच्या मॉडेलची घोषणा केली. ‘एक्सपिरीया झेड’ नावाचा हा मोबाईलमधील सॉफ्टवेअरपासून बॉडी पार्टपर्यंत सर्व फिचरमध्ये कंपनीने आधुनिक टेक्नोलॉजी वापरली आहे. या फोनची खासबात म्हणजे हा मोबाईल वॉटरप्रुफ आणि डस्ट रेझिस्टट असणार आहे. त्यामुळे अगदी अंघोळ करतानाही तुम्हाला हा फोन वापरता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


‘एक्सपिरीया झेड’ या फोनची खास फिचर्स
> १.५ गिगा हर्ट्स स्नॅपड्रॅगन एस फोर प्रो क्वाड- कोअर प्रोसेसर> ५ इंच हाय डेफिनेशन टच स्क्रीन. १९२०x१०८० रिझल्यूशन> ४.१ इका जेली बीन सिस्टीमवर चालणारा फोन> वॉटरप्रुफ आणि डस्ट रेझिस्टट> दोन जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट मेमरी. तसेच मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ती ३२ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.> फोर जी/ एलटीई बॅण्ड हायस्पीड इंटरनेट सपोर्ट> १३.१ मेगापिक्सलचा कॅमेरा, २.२ मेगापिक्सल फ्रण्ट- फेसिंग कॅमेरा (सध्याच्या आयफोन ५ आणि सॅमसंग गॅलक्सी एस् थ्रीमध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा आहे).

इतकी वैशिष्ट्ये असणारा सोनी ‘एक्सपिरीया झेड’ सध्या तरी भारतात उपलब्ध नसून तो लवकरच आयफोन ५, मोटोरोला रेझर आणि सॅमसंग गॅलक्सी एस थ्री सारख्या स्मार्ट फोनला टक्कर देण्यासाठी भारतीय बाजार पेठेत उतरवण्यात येणार आहे. या मोबाइलची भारतातील किंमत इतर महागड्या स्मार्टफोनपेक्षा जरा कमीच असणार आहे. सोनी एक्सपिरीया झेड भारतील किंमत ३५ हजारापर्यंत असण्याची शक्यता आहे.

Exit mobile version