मोबाइलमध्ये प्रोजेक्टर

लॅपटॉप , पेनड्राइव्ह , जाडजूड वायर्स आणि व्हाइट स्क्रीन .. प्रेझेंटेशनसाठी करावी लागणारी ही तयारी . हे सगळंविसरा आता . केवळ मोबाइलने तुम्ही उत्तम प्रेझेंटेशन देऊ शकता . त्यासाठी हवी एक भिंत किंवा प्लेन सरफेस . 


प्रोजेक्टर मोबाइलचा जन्म 


इपोक नावाच्या ब्रिटनमधल्या कंपनीने या प्रोजेक्टर मोबाइलची कसेंप्ट आणली . ब्रिटन आणि अमेरिकेतडॉक्युमेंट अॅसेम्बलिंग टेक्नॉलॉजी पुरवतात . या कंपनीच्या प्रोजेक्टर विभागाने २००८ मध्ये या मोबाइलचाविकास केला आणि २५ ऑगस्ट २००८ ला तो येथील बाजारात आला . या मोबाइलमुळे एसएमएस आणि फोनव्यतिरिक्त मोबाइलचा स्मार्टफोन म्हणूनही वापर होऊ शकतो . पहिल्यांदा विकसित करण्यात आलेला हाप्रोजेक्टर मोबाइल दिसायला एकदम साधा असला तरी यामध्ये टचस्क्रीन , ब्लुट्यूथ , १ जीबी मेमरी ही फिचर्सआहेत . 


इंटरनॅशनल मार्केट 


या अनोख्या टेक्नॉलॉजीला बाजारपेठेत स्थान मिळण्यासाठी फार काळ वाट पहावी लागली . इपोक याकंपनीनंतर बऱ्याच स्थानिक कंपन्यांनी अशी मॉडेल्स आणण्यास सुरुवात केली . पण , त्यांना फार यश ‌ आलं नाही. यानंतर सॅमसंगने जुलै २०१०मध्ये आपले बीम हे प्रोजेक्टर मोबाइलचे मॉडेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणले .पण , त्यांनी ही सुविधा भारतासारख्या देशांपासून दूर ठेवली . यामुळे आपल्याला हा मोबाइल परदेशातूनमागवावा लागतो . 


लक्ष्य ‘ मॅनेजमेंट ‘ विद्यार्थी 


भारतात प्रोजेक्टर मोबाइल सर्वप्रथम चेन्नईतल्या टेकबेरी या मोबाइल कंपनीने बाजारात आणला . १८ नाव्हेंबर२०१० ला याचे अधिकृत लॉचिंग करण्यात आले . त्यानंतर इंटेक्स या कंपनीने आपला मोबाइल भारतात आणला. पण , सामान्य ग्राहकांकडे दुर्लक्ष केल्याने या कंपनीच्या मोबाइलबाबत फारशी कोणाला माहिती नव्हती .मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि कर्मचारी हे आमचे मुख्य ग्राहक असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे . यानंतर स्पाइसमोबाइलने सर्वसामान्य ग्राहक लक्षात घेऊन हा मोबाइल बाजारात आणला आणि त्याची आकर्षक जाहिरात करूनहा विषय उत्सुकतेचा बनविला . यामुळे ही टेक्नॉलॉजी सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं यश हे स्पाइस मोबाइलकडेचजाते . स्मार्टफोन , आयफोन , टॅबलेट यांच्या भाऊगर्दीत हा मोबाइल ग्राहकांना कसा आकर्षित करेल हे लवकरचकळेल . 


स्पाइस एम ९००० 


स्पाइसच्या खास मोबाइलच्या जाहिरातींमुळे सर्वांपर्यंत पोहोचलेला हा मोबाइल भारतातील बहुतांश मार्केटकाबीज करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . यामध्ये ८७ एमबीची इंटरनल मेमरी असून १६जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल आहे . यात जीपीआरएस , वॅप , युएसबी कनेक्टर , ब्लूटूथ या सुविधा आहेत .याचबरोबर ड्युएल सिमच्या या मोबाइलमध्ये ३ . २ मेगापिक्सलचा कॅमेराही आहे . याची किंमत साधारणत :६९०० ते ७५०० पर्यंत आहे . 


मायक्रोमॅक्स एक्स ४० 


स्वस्त आणि मस्त मोबाईलची रेंज बाजारात आणणारा मायक्रोमॅक्स या कंपनीनेही आपला प्रोजेक्टर मोबाइलबाजारात आणला आहे . विशेष म्हणजे हा ड्युअल सिम प्रोजेक्टर मोबाइल आहे . याशिवाय यामध्ये रेडिओ ,ओपेरा मिनी ब्राउझर , इबुक अशा विविध सुविधा आहेत . याचबरोबर मोबाइल ट्रॅकरही यामध्ये उपलब्ध आहे .यात २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे . या मोबाइलची किंमत पाच ते साडेपाच हजार इतकी आहे . 


टेकबेरी एसटी – २०० 


भारतात प्रोजेक्टर मोबाइलची मुहुर्तमेढ करणारी ही कंपनी . या कंपनीचा भारतीय बनावटीच्या यामोबाइलमध्ये टचस्क्रीन उपलब्ध आहे . याची स्क्रीन ३ . २ इंचांची असून यामध्ये दोन मेगापिक्सलचा फ्लॅशकॅमेरा आहे . यामध्ये १०८० पिक्सलची एचडी स्क्रीन वापरण्यात आली आहे .. 


इंटेक्स 


हे मोबाइलमधून करण्यात येणारे प्रोजेक्शन आपल्याला ३६ इंचांचे दिसू शकते . यामध्ये एलइडी टेक्नॉलॉजीवापरण्यात आल्याने रिझल्ट आणखीनच सुस्पष्ट असेल . तसंच , हा मोबाइल ड्युएल सिम आहे . प्रोजेक्टर लावूनसलग तीन तास आपण त्याचे चित्र भिंतीवर पाहू शकतो . याचा अर्थ असा की , यामध्ये असलेली बॅटरी सलग तीनतास चालते . याची मेमरी १६ जीबीपर्यंतच एक्स्पाण्डेबल आहे . यामध्ये एलइड फोकस वापरण्यात आला असूनएका सेकंदाला फोटोच्या २५ फ्रेम बनू शकतात . या प्रोजेक्टर मोबाइलची किंमत १० ते १२ हजाराच्या आसपासआहे . 


समसंग गॅलक्सी बिम I8530 


मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या ब्रँडबरोबरच काही प्रस्थापित ब्रँडही आता प्रोजेक्टर मोबाइलच्या मार्केटमध्ये उतरलेआहेत . सॅमसंग गॅलक्सी बिम नावाचा आपला पहिला वहिला प्रोजेक्टर मोबाइल बाजारात आणला आहे . इतरकंपन्यांच्या प्रोजेक्टर मोबाइलच्या तुलनेत हा मोबाइल खूप महाग आहे . असे असले तरी हा फोन खूप चांगलेरिझल्ट्स देतो . यात डिजीटल लाईट प्रोजेक्टर आहे . म्हणजे हा प्रोजेक्टर वापरताना अंधार करण्याची गरजभासत नाही . यात पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आहे . याची किंमत ३० हजार रुपयांपर्यंत आहे .

Exit mobile version