चेहर्‍याकडे पाहून नाडी परीक्षा करणारा स्मार्टफोन

तुमच्या चेहर्‍यावरील भाव पाहून नाडीचे ठोके ओळखणारा स्मार्टफोन, Tablet  विकसित करण्यात तंत्रज्ञांना यश आले आहे. जपानच्या तंत्रज्ञांनी या शोधाचा दावा केला आहे.

स्मार्टफोनमधील कॅमेरा किंवा वेबकॅमेर्‍याने काढलेल्या चेहर्‍याच्या छायाचित्रावरून हे तंत्रज्ञान ठोक्याची गती मांडण्यास सक्षम आहे. तेही केवळ पाच सेकंदात. त्याचा उपयोग व्यक्तीला आपले आरोग्य राखण्यासाठी होऊ शकणार आहे. सामान्य व्यक्तीला स्मार्टफोन, टॅब्लेटच्या साह्यानेदेखील त्याचा सहजपणे वापर करता यावा, यासाठी याची मदत होणार आहे. या तंत्रज्ञानासाठी कोणत्याही विशेष हार्डवेअरची गरज भासत नाही, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रक्तप्रवाहातील गतीवर व्यक्तीच्या चेहर्‍यावरील चमक ठरते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या वैशिष्ट्यावर ती अवलंबून असते. चेहर्‍यावरील विविध रंगांचे विश्लेषण करण्याचे काम या तंत्रज्ञानातून करण्यात येते. त्यात लाल, हिरवा, निळ्या रंगाचा समावेश आहे. फिजित्सु लॅबोरेटरीमध्ये हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.कंपनीने या वर्षी हे तंत्रज्ञान बाजारात उतरवण्याचा संकल्प केला आहे. आरोग्य क्षेत्रात देखभालीसाठी त्याचा वापर करता येणार आहे. गर्दी असणार्‍या कामाच्या ठिकाणी किंवा पर्सनल कॉम्प्युटरसमोर बसलेली व्यक्ती, यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

Exit mobile version