MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग Galaxy Z Flip : घडी घालता येईल असा डिस्प्ले असलेला स्मार्टफोन!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 12, 2020
in स्मार्टफोन्स

सॅमसंगने आज त्यांचा नवा फोन सादर केला आहे ज्यामध्ये जगात प्रथमच घडी घालता येईल अशी काच असलेला डिस्प्ले जोडण्यात आला आहे! होय या फोनची मधल्या भागात घडी घालता येते. यापूर्वीच्या गॅलक्सी फोल्डची घडी उघडली तर त्याचा जवळपास टॅब्लेट एव्हढा आकार व्हायचा मात्र हा फोनच्या आकाराचाच फोन घडी घातल्यावर आणखी लहान होतो आणि पूर्वीच्या काही प्रसिद्ध फोन्स प्रमाणे उघडून वापरता येतो! अतिशय पातळ असलेल्या या काचेची २,००,००० वेळा घडी घालता येईल असा दावा सॅमसंगने केला आहे! ही काच सॅमसंगने स्वतः तयार केलेली आहे.

हा फोन clam-shell प्रकारचा म्हणजे शिंपल्याच्या उघडझाप ज्याप्रमाणे करता येते तसा आहे. मात्र आधीच्या फोन्स इतका सहज नाही. एका हाताने सहज उघडला जात नाही असं अनेकांनी मत नोंदवलं आहे. या फोनचा डिस्प्ले 6.7″ OLED असून 21.9:9 aspect ratio आहे. सोबतच एक 1.1 इंची OLED डिस्प्लेसुद्धा पाठीमागे देण्यात आला आहे जो फोन घडी घातलेल्या स्थितीत असताना नोटिफिकेशन्स दाखवेल. फोनमध्ये Snapdragon 855 Plus हा प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB स्टोरेज आणि 3300 ची ड्युयल बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरासाठी यामध्ये दोन 12MP लेन्स (एक अल्ट्रा वाईड व एक रेग्युलर वाइड) आणि 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये आज सादर झालेल्या Galaxy S20 मालिकेतील फोन्सप्रमाणे 5G मात्र देण्यात आलेलं नाही. हा फोन 14 फेब्रुवारी पासून अमेरिका आणि कोरियामध्ये उपलब्ध होतोय तोसुद्धा जवळपास ~रु ९९००० ($1380) एव्हढया किंमतीत!

ADVERTISEMENT

डिस्प्ले : 6.7“ FHD+ Dynamic AMOLED Display(21.9:9) Infinity Flex Display + 1.1“ Super AMOLED Display
प्रोसेसर : 7㎚ 64-bit Octa-Core Processor
रॅम : 8GB LPDDR4X
स्टोरेज : 256GB
कॅमेरा : 12MP Ultra Wide Camera: F2.2 +
12MP Wide-angle Camera: Super Speed Dual Pixel AF, OIS, F1.8 FOV: 78˚, OIS,Up to 8x digital zoom HDR10+ recording Tracking AF
फ्रंट कॅमेरा : 10MP Selfie Camera: F2.4 Pixel size: 1.22μm FOV: 80˚
बॅटरी : 3300mAh 27W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac (2.4/5GHz),VHT80 MU-MIMO,256QAM, Bluetooth v 5.0 (LE up to 2Mbps), ANT+, USB Type-C, NFC, Location (GPS, Galileo, Glonass, BeiDou)
सेन्सर्स : Capacitive Fingerprint sensor (side), Accelerometer, Barometer, Gyro sensor, Geomagnetic sensor, Hall sensor (digital, analog), Proximity sensor, RGB Light sensor
किंमत : $1380

Search Terms Samsung Galaxy Z Flip Foldable Display Smartphone Price in India, Sale, Pre Order

Tags: GalaxyGalaxy FoldGalaxy Z FlipInnovationSamsungSmartphones
Share4TweetSend
Previous Post

सॅमसंग Galaxy S20, S20+ व S20 Ultra सादर : सर्वोत्तम स्मार्टफोन्स!

Next Post

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०२० करोना व्हायरसमुळे रद्द!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Nothing Phone 1

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

July 12, 2022
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Next Post
मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०२० करोना व्हायरसमुळे रद्द!

मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०२० करोना व्हायरसमुळे रद्द!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

August 14, 2022
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022

VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी : वेबसाइट, डाउनलोड ब्लॉक!

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!