आता हवेत लिहा

आतापर्यंत कागदावर लिहिणे , मोबाइलमध्ये टाइप करणेकिंवा इलेक्ट्रॉनिक पेनचा वापर करून लिहिणे , कम्प्युटर टायपिंग यासारख्या गोष्टी सर्वसामान्यांना ज्ञात होत्या .पण कधी हवेत लिहिता येईल आणि ते इमेलद्वारे पाठविता येईल , असा विचार कुणी गांभीर्याने केलाच नव्हता .केवळ काहीतरी हवेत बोटं फिरवून समोरच्याला तात्पुरत्या स्वरूपात संदेश पोहोचविण्यापर्यंत हे मर्यादित होतं .पण जर्मन संशोधकांनी हवेत लिहून इमेल , मेसेज पाठविण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणलं आहे . 

जर्मनीतील कार्ल्सरूह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधकांनी एक विशेष प्रकारचे हँडग्लोव्हज तयार केलेआहेत . यामुळे टचस्क्रीनवर , कीबोर्ड किंवा मोबाइलवर बोटांच्या आधारे एसएमएस टाइप करणे यासारख्यागोष्टी हद्दपार होतील , असा दावा या संशोधकांनी केला आहे . ख्रिस्तोफ अम्मा व सहकाऱ्यांनी तयार केलेल्याग्लोव्हजमध्ये अॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप बसविण्यात आले असून , या आधारे हाताच्या हालचालीटिपल्या जातात . ही उपकरणे नंतर हवेत काढलेली अक्षरे ओळखतात व त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये कन्व्हर्टकरतात . हा डिजिटल टेक्स्ट नंतर वायरलेस माध्यमाद्वारे इमेल , एसएमएस किंवा मोबाइल अॅपमध्ये पाठवलाजातो . पॅटर्न रिक्गनिशन सॉफ्टवेअर ही सिस्टीम अक्षरे ओळखते . यामध्ये जवळपास आठ हजार शब्द आणिवाक्य लक्षात ठेवण्याची क्षमता आहे . अगदी कॅपिटल आणि स्मॉल लिखाण ओळखण्याचीही सुविधा यात आहे . 

सध्या यामध्ये ११ टक्के वेळा त्रुटी आढळून आल्या . मात्र , लिहिणाऱ्याची पद्धत लक्षात आल्यानंतर या त्रुटी तीन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात . विशेष म्हणजे , हे ग्लोव्हज घालून एखादी व्यक्ती लिहीत आहे किंवा इतर काहीकाम करत आहे , हे ओळखण्याची सुविधा या तंत्रज्ञानामध्ये आहे . 
त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता कमी होईल .या संशोधनाला ८१ हजार डॉलर्सचा गुगल फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड मिळाला असून , या आधारे मोबाइल किंवा इतरमाध्यमातून हवेत टाइप करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास मदत होईल , अशी आशा संशोधकांना आहे .
सध्या यावर संशोधन सुरू असून बाजारात विक्रीसाठी ते कधी खुले होईल , हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही . तरीभविष्यात जेव्हा केव्हा हे संशोधन सर्वसामान्यांच्या वापरात येईल तेव्हा , मात्र टायपिंगचा कंटाळा असणाऱ्यांचीसोय होईल . पण बोटांनी टाइप करण्यापेक्षा हवेत हात हलवून टाइप करण्याचा वेग निश्चितच कमी असणारअसल्याने टायपिंगचा वेग मात्र कमी होईल.

Exit mobile version