खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍त

खुशखबर ! सॅमसंग Galaxy S3, Grand Duos आणि S Duos झाले स्‍वस्‍तभारतीय मोबाईल बाजारातील कंपन्‍यांच्‍या ‘प्राईस वॉर’मध्‍ये सॅमसंगनेही उडी घेतली आहे. गॅलेक्‍सीचे नवे व्‍हर्जन लॉंच केल्‍यानंतर आता सॅमसंगने आपल्‍या दुस-या मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या आहेत. बाजारात गॅलेक्‍सी एस 4 लॉंच झाल्‍यानंतर त्‍यांनी जुन्‍या गॅलेक्‍सी मॉडेलच्‍या किंमती कमी केल्‍या. सॅमसंगच्‍या विविध मॉडेलच्‍या किंमती 600 ते 2000 रूपयांपर्यंत कमी करण्‍यात आल्‍या आहेत. 
स्‍नॅपडील डॉट कॉमवर Samsung Galaxy s3 (product code: I9300) 16 जीबी व्‍हर्जन, अँड्राएड आईस्‍क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टिम आता 2000 रूपये कमी होऊन 28,999 रूपये इतका झाला आहे. हाच फोन दुस-या स्‍टोअरमध्‍ये 30950 रूपयांना मिळतोय.

Samsung Galaxy S Duos (product Code: s 7562) हा फोन सॅमसंग स्‍टोअरमध्‍ये 13815 रूपयांना उपलब्‍ध आहे. सॅमसंग स्‍टोअर 1199 रूपयांच्‍या ब्‍ल्‍यू टूथवरही 300 रूपये विशेष सूट देण्‍यात आली आहे.

Galaxy Grand Duos (product code: I 9082) – नुकताच याच्‍या किंमतीत 600 रूपयांची घट केली गेली आहे.

Exit mobile version