गुगल कीप : मोबाईलमध्ये रिमांइडर्स

असे म्हणतात की, बाजारपेठेतील उत्पादनांमध्ये त्या त्या काळाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. म्हणजे मिक्सर बाजारात केव्हा आला ? महिला मोठय़ा संख्य़ेने कामाला जाऊ लागल्या, त्या वेळेस त्यांना घरातील काम चटकन होण्यासाठी तशा प्रकारच्या उपकरणाची गरज भासली त्यावेळेस त्याची निर्मिती झाली. 

आता दिवसेंदिवस स्त्री- पुरुषांच्या व्यग्रतेमध्येही वाढ झाली आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल किंवा मग गृहिणी असाल तरीही खूप गोष्टींचे भानोता तुम्हाला ठेवावे लागते. पूर्वी अशा गोष्टी लिहून ठेवल्या जात. त्यानंतर चिकटकागद आले आणि त्यानंतर मोबाईलमध्ये रिमांइडर्सही आले. पण तरीही या सर्व गोष्टी काहीशा अपुऱ्या पडताहेत की, काय अशीच स्थिती होती. मध्यंतरीच्या काळात स्मार्टफोनही आले. त्यावर क्विक नोटसारख्या सुविधाही आल्या. पण तरीही काही तरी कमी मात्र सतत जाणवत होती. ती कमी दूर करण्याचे काम आता गुगलने आणलेल्या कीप या नव्या अ‍ॅप्सने केले आहे. गुगल प्ले स्टोअरमधून तुम्हाला हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येते. त्यामध्ये चेकलिस्ट करणे, व्हॉइस रिमांडर लावणे, फोटो काढून तो आवश्यक त्या ठिकाणी जोडणे, त्याची माहिती सोबत देणे, आदी सर्व बाबी करण्याची सुविधा आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्मार्टफोनवर केलेल्या या सर्व नोंदी तुम्ही वापरत असलेल्या सर्व उपकरणांवर तुम्हाला उपलब्ध होतात कारण त्या क्लाऊडवर सेव्ह केल्या जातात. Google Keep = Evernote Alternativeया अ‍ॅप्समध्ये आणखी एक महत्त्वाची सुविधा आहे ती म्हणजे ट्रान्स्क्राइबची. म्हणजे तुम्ही तोंडी बोलत गेलात तर तुम्ही जे सांगत आहात ते प्रत्यक्ष अक्षरामध्ये उतरवून काढले जाते तेही याच अ‍ॅप्सतर्फे. फक्त सध्या तरी त्यात फीड केलेले इंग्रजी हे अमेरिकन वळणाचे असल्याने अमेरिकन पद्धतीने उच्चार केल्यास ते व्यवस्थित टाइप केले जाते. 

Download >>>> Google Keep <<<<
लोकांना अनेक प्रकारच्या सोयी हव्या असतात, हे लक्षात घेऊनच गुगलने त्यांच्या ‘गुगल कीप’ या अ‍ॅप्समध्ये तुम्ही केलेल्या नोंदींना त्यांच्या महत्त्वानुसार, वेगवेगळे रंग देण्याची सोय केली आहे. त्यामुले रंग पाहूनच तुम्हाला एखादी नोंद किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येऊ शकतो. याचा यूजर इंटरफेस सहज- सोपा आहे. सिंक्रोनायझेशनची सुविधा तर अतिशय उपयुक्त ठरावी, अशीच आहे. हे अ‍ॅप्स अँड्राइड बाजारपेठेसाठी विकसित करण्यात आले असून ते मोफत उपलब्ध आहे.
Exit mobile version