आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइल

आता आला नोकियाचा सगळ्यात स्वस्त कलर मोबाइलआघाडीची मोबाइल निर्माता कंपनी ‘नोकिया’ने आपला सगळ्यात स्वस्त हँडसेट ‘नोकिया 105’ मंगळवारी भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. नोकियाचा हा कलर मोबाइल असून त्याची किंमत 1,249 रुपये इतकी आहे. ‘नोकिया 1280’चे हे नवे व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे.



‘नोकिया 105’मध्ये एफएम रेडीओ आणि फ्लॅश लाईट आदी सुविधा उपलब्ध आहेत. उल्लेखनीय म्हणजे  यापूर्वी लॉन्च केलेल्या ‘नोकिया 1280’ ची विक्रमी 10 कोटींपेक्षा जास्त विक्री झाली होती.नोकिया105 हे नाविन्यपूर्ण डिझाईन सर्वांत कमी किंमतीत उपलब्ध आहे. तसेच यात बेस्ट फीचर्सही आहेत
दूसरीकडे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने भारतीय बाजारात स्‍मार्ट टीव्ही आणि एलईडी टीव्हींची मालिका सादर केली आहे. फूजी फिल्म इंडियाने भारतीय बाजारात पहिला 3 डी कॅमरा ‘फाइनपिक्स रियल 3 डी’ लॉन्च केला आहे. 10 मेगापिक्सेलच्या कॅमेराने 3डीसोबत 2डी फोटोग्राफीही करता येते. या कॅमेराची किंमत 39,999 रुपये आहे.
 3 डी कॅमेराचे वैशिट्ये

> स्वतंत्र शटर 3 डी मोडमध्ये हा कॅमेरा एका पाठोपाठ एक असे दोन फोटो शूट करू शकता. तसेच 3डी फोटोही सेव्ह करतो.  
> 3 डी व्ह्यूसाठी कॅमरामध्ये असलेल्या पॅरालेक्स कंट्रोल 3 डी रिचर्सचा वापर करू शकता येते.
> कॅमेरामध्ये लेजर पॉवरचा वापर करण्‍यात आला आहे. यामुळे उन्हातही फोटोच्या क्वालिटीवर परिणाम होत नाही.  
> या कॅमेराने एक किलोमीटर लांबचेही फोटो काढता येतात.
> लेजरच्या माध्यमातून लांब उभ्या असलेल्या व्यक्तिचे मॅपिंग करून फोटो काढता येऊ शकतो.

Exit mobile version