आता तुमचा मोबाइल होईल पाण्‍यावर चार्ज

आता तुमचा मोबाइल होईल पाण्‍यावर चार्जआज मोबाइल जीवनावश्‍यक वस्तू बनली आहे. घराबाहेर निघताना मोबाइलला चार्जिंग आहे की नाही याविषयी खात्री करूनच बहुतेक जण घराबाहेर पडतात. मात्र चार – पाच दिवस कामानिमित्त बाहेर गेल्यास मोबाइल चार्जिंगचा प्रश्‍न निर्माण होतो व अशा वेळेस काय करायचे असा प्रश्‍न निर्माण होतो. अशा वेळी मोबाइलला पाण्‍याने चार्ज केले जाईल अशा पध्‍दतीचे संशोधन स्टॉकहोम येथील केटीएच रॉयल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. या चार्जरच्या आत बसवलेल्या रिसायकेबल मेटल डिस्कवर पाणी टाकल्यास त्यातून हायड्रोजन गॅस बाहेर पडतो जो ऑक्सिजनबरोबर रासायनिक संयोग होऊन विद्यूत ऊर्जेत रूपांतरित होतो. एमएफसीचे संस्थापक आणि केटीएचचे शास्त्रज्ञ अ‍ॅंडर्स लुंडब्लेड   यांनी सांगितले की या प्रस्तुत उपकरणातून ताजे किंवा समुद्रपाण्‍यातून ऊर्जा मिळू शकते. या उपकरणाला विकसनशील देशात जादा मागणी असेल.नागरिकांमध्‍ये फ्यूल सेल्सची स्वीकारता वाढली आहे. एमएफसी पॉवरट्रेक प्रॉडक्ट यापूर्वीच या तंत्रज्ञानाची विक्री जपान, अमेरिका, इंग्लंड  देशात सुरू केली आहे.

Related keywords : Mobile, charging, water charging, innovation

Exit mobile version