फेसबुक शेअरिंगमध्ये भारतीयच ‘शेर’

फेसबुक‘कोणीही उठतो, काहीही करतो आणि फेसबुकवर टाकतो’… मग ती गोष्ट सार्वजनिक असो की खासगी आयुष्यातील. सोशल साइट्सवरील ‘सर्वांसाठी सर्वकाही’ ही वृत्ती भारतीयांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत असून त्यामुळे फेसबुक शेअरिंग आणि ट्विटरवरील ‘टिवटिवात’ भारतीयांनी अनेक देशांना मागे टाकल्याचे एका अभ्यासातून उघड झाले आहे.

‘इंटरनेट आणि कंप्युटिंग ट्रेण्ड’ या अमेरिकी कंपनीने याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार खासगी जीवनातील ‘सर्वकाही’ ऑनलाइन शेअर करणाऱ्या युझर्सच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर याच यादीत सौदी अरेबियाने पहिला क्रमांक पटकावला आहे. 


केलिनर परकिन्स कॉफिल्ड अॅण्ड बायर्स (केपीसीबी) या फर्मने केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर, इंटरनेट युझर्सची वाढती संख्या, टॅबलेट कंप्युटिंगचा वापर आदींचा अभ्यास करून ‘मिकर रिपोर्ट’ नावाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यात ऑनलाइन शेअरिंगमध्ये स्टेटस अपडेट्स, भावना शेअर करणे, फोटो, व्हिडीओ आणि लिंक्स शेअर करणे या गोष्टींचा समावेश आहे.


मागील वर्षात स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येचा विचार करता जगभरातील देशामध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागत होता. त्या तुलनेत यंदा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ५२ टक्क्यांनी वाढली आहे. २००८ ते २०१२ या चार वर्षांत भारतामध्ये ८८ लाख स्मार्टफोनची विक्री झाली असून मागील वर्षात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही १३७ लाखावर जाऊन पोहोचली आहे. स्मार्टफोन वापरात चीन खालोखाल भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनमधील स्मार्टफोनधारकांची संख्या २६४ लाख तर इंटरनेटधारकांची संख्या ५६४ लाख इतकी मोठी आहे.


दिवसभरात स्मार्टफोन युझर्स किती वेळा आणि कोणत्या कारणासाठी आपला मोबाईल वापरतात याचीही पाहणी करण्यात आली. त्या पाहणीनुसार, ‘सर्वसामान्य स्मार्टफोन युझर दिवसभरात १५० वेळा आपला फोन चेक करतो. त्यापैकी १८ वेळा तो वेळ पाहण्यासाठी तर, २३ वेळा मेसेज अपडेट पाहण्यासाठी मोबाइल हातात घेतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुरक्षितता तुमच्या अकाऊंटची Secure email or facebook accounts


Related Keywords :
india tops in social sharing with facebook
facebook sharing
KPCB
internet users in india 

Exit mobile version