4जी पेक्षाही वेगवान; अवघ्‍या 40 सेकंदात डाऊनलोड होणार चित्रपट


दक्षिण कोरियाची सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर ‘एसके टेलिकॉम’ कंपनी या आठवडयात जगातील सर्वात वेगवान वायरलेस नेटवर्क लॉंच करणार आहे. एलटीई अडव्‍हान्‍समध्‍ये 4जी नेटवर्कपेक्षाही दुप्‍पट आणि 3जी नेटवर्कपेक्षा 10पट वेगाने डाटा डाऊनलोड होईल.



पुढच्‍या वर्षी सगळीकडे होणार लॉंच
ही सुविधा सुरूवातीला सिओलमध्‍ये मिळेल. दक्षिण कोरियाची 60 टक्‍के लोकसंख्‍या म्‍हणजेच 3 कोटी 30 लाख लोक एलटीईचे ग्राहक आहेत. एलटीई अडव्‍हान्‍स याचेच अपग्रेड स्‍वरूप आहे. काही मोजक्‍या स्‍मार्टफोनवर पुढच्‍यावर्षी 2014पर्यंत लॉंच होण्‍याची आशा आहे.


वैशिष्‍टे

150 एमबी प्रति सेकंद डाटा ट्रान्‍सफर रेट  Download Speed
37.5 एमबीपीएसचा स्‍पीडने डाटा होईल अपलोड Upload Speed

Exit mobile version