सॅमसंगने आणले जबरदस्‍त ‘गॅलेक्सी एस4 झूम’ आणि ‘एस4 मिनी’

सॅमसंगने आणले दोन जबरदस्‍त स्‍मार्टफोन, 'गॅलेक्सी एस4 झूम' आणि 'एस4 मिनी' लॉंचमायक्रोमॅक्‍सचा कॅनव्‍हास4 स्‍मार्टफोन लॉंच झाल्‍यानंतर आता सॅमसंगने गॅलेक्सी एस-4 झूम मिनी आज (मंगळवारी) लॉंच केला. सॅमसंगने या फोनबाबत यापूर्वी घोषणा केली होती. त्‍यामुळे एस-4 झूम मिनीबाबतही प्रचंड उत्‍सुकता होती. या फोनमध्‍ये आकर्षक फिचर्स आहेत. स्‍मार्टफोनच्‍या स्‍पर्धेत आपण कायम अग्रेसर असल्‍याचा दावा सॅमसंगने यानिमित्ताने केला आहे.

‘गॅलेक्सी एस-4 झूम मिनी’ स्‍मार्टफोनला 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याशिवाय झेनॉन फ्लॅशही देण्‍यात आला आहे. तसेच कॅमेराला ‘सीमॉस’ सेन्‍सर आहे. ऑप्‍टीकल इमेज स्‍टॅबिलायझरमुळे चांगले फोटो काढता येतात.फोनमध्‍ये 10X ऑप्‍टीकल झूम आहे. यामुळे झूम करुन चांगले फोटो काढता येऊ शकतात. फोनला क्‍यू-एचडी एस-आलेड (960*540) डिस्‍प्‍ले आहे.

या फोनला एक झूम रिंग आहे. ती फिरवताच ‘इन कॉल फोटो शेअर’ फिचर सुरु होते. या फिचरमुळे कॉल करतानाही फोटो काढून एमएमएसद्वारे पाठविणे शक्‍य आहे. एस4 झूममध्‍ये 1.9 मेगापिक्‍सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.फोन तांत्रिकदृष्‍ट्या अतिशय पॉवरफुल आहे. फोनला 1.5 GHz ड्युअल कोर प्रोसेसर असून ऍंड्रॉईड 4.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिमवर तो चालतो.
फोनला 1.5 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल स्‍टोरेज आहे. युझर्ससाठी 5 जीबी इंटरनल स्‍टोरेज मेमरी उपलब्‍ध राहील. तसेच 64 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येईल. या फोनला 2330 mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी आहे. तसेच महत्त्वाची बाब म्‍हणजे किंमत 29,900 रुपये आहे.’गॅलेक्सी एस4 मिनी’ आणि ‘एस4 झूम’मध्‍ये दोन मोठे फरक आहेत. ‘मिनी’मध्‍ये 1.7 GHz ड्युअल कोर प्रोसेसर आहे. तसेच हा फोन ऍंड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टिमवर चालतो. याशिवाय 1.5 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल मेमरी फोनमध्‍ये आहे.

Exit mobile version