सॅमसंगचा नवा फंडा; फोनवर हजारोंची सूट

samsung-400
मोबाइल ग्राहकांसाठी एक खास खूशखबर… सॅमसंगने गॅलक्सी स्मार्टफोनसाठी घसघसशीत सूट देणार असल्याचे जाहीर केले आहे. गॅलक्सी सिरीजमधील फोनवर १०५० ते ६३८० रूपयांची सूट मिळणार आहे. सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोनने भारतीय बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मोबाइलच्या अनेक नामांकित कंपन्यांना धूळ चारीत सॅमसंगने आपला चांगलाच जम बसवला आहे.
नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या सवलती यामुळे सॅमसंगने ग्राहकांना आपलंस करून घेतलं आहे. 


सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोनवर ६३८० रूपयाची सूट दिल्यानंतर २२,५०० इतक्या किंमतीत ‘गॅलक्सी नोट’ उपलब्ध आहे. ऑनलाइन खरेदीवर गॅलेक्सीची किंमत २६ ते २७ हजार इतकी आहे. गॅलक्सी नोट २०११च्या शेवटी बाजारात आला होता. यात २.३ ही जुनी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आली होती. यानंतर कंपनीने गॅलेक्सी नोट २ आणलं. आता कंपनी गॅलक्सी ३ आणण्याचा तयारीत आहे. 


सॅमसंगने गॅलक्सी चॅटच्या किंमतीत ३१४० रूपये सूट दिली आहे. त्यानंतर याची किंमत ५२५० इतकी झाली आहे. तर गॅलक्सी ऐसवर २४०० रूपयांची सूट दिल्याने त्याची किंमत ८५०० इतकी आहे. गॅलक्सी वाय ड्युओस लाइटवर २२९० रूपये सूट दिली आहे. त्यानंतर ५२०० रूपये किंमतीत हा मोबाइल उपलब्ध होणार आहे. 


गॅलेक्सी फेमवर १२०० रूपयांची सूट देण्यात आल्यानंतर १०,२०० इतकी त्याची किंमत झाली आहे. गॅलक्सी वाय ड्युओसवर १०९० रूपयांची सूट दिली आहे. त्यानंतर त्याची किंमत ६९५० इतकी आहे. गॅलक्सी वायवर १०७० रूपयांची सूट आहे. याची किंमत ५२०० इतकी आहे. गॅलक्सी वाय प्लसवर १०५० रूपयांची सूट आहे. त्यामुळे फक्त ५५५० रूपयात खरेदी करता येईल. या आकर्षक सवलतीला ग्राहक कसा प्रतिसाद देतात याकडेच कंपनीचे लक्ष लागून राहिले आहे. 

Exit mobile version