OpenAI ने भारतीय वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ChatGPT Go हा पेड प्लॅन आता भारतात एक वर्षासाठी मोफत उपलब्ध होणार आहे. साधारणपणे या प्लॅनची किंमत ₹३९९ प्रति महिना (म्हणजे वर्षाला जवळपास ₹४७८८) असते, पण आता भारतीय युजर्सना तो पूर्णपणे फ्री मिळणार आहे.
ChatGPT Go मध्ये काय काय मिळणार?
ChatGPT Go हा OpenAI चा त्यांचा सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन आहे. हा प्लॅन फ्री व्हर्जनपेक्षा खूप जास्त सुविधा देतो
- जास्त मेसेज लिमिट मिळते(फ्री व्हर्जनपेक्षा दहा पट जास्त मेसेजेस)
- अधिक लवकर उत्तरे मिळतील
- अधिक इमेज जनरेशन (AI इमेजेस तयार करण्याची सुविधा)
- अधिक फाईल अपलोड करून त्यावर काम करण्याची सोय
- GPT-5 या लेटेस्ट मॉडेलचा वापर करता येणार
OpenAI ने नुकताच डेव्हलपर्ससाठी DevDay Exchange Bengaluru हा त्यांचा भारतातील पहिला मोठा कार्यक्रम आयोजित केला. त्याच निमित्ताने भारतीय युजर्ससाठी ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. भारत हा OpenAI साठी सर्वात वेगाने वाढणारा बाजार आहे. भारतीय युजर्सचा उत्साह लक्षात घेऊन ही ऑफर देण्यात आली आहे.

ऑफर कशी मिळवायची?
- ४ नोव्हेंबर २०२५ पासून ही ऑफर सुरू झाली आहे
- नवीन आणि आधीचे दोन्ही युजर्स ही ऑफर ॲक्टिव्हेट करू शकतात
- ChatGPT ॲप किंवा वेबसाईटवर लॉगिन केल्यावर वरील प्रमाणे बॅनर आलेला दिसेल किंवा वर Upgrade for free बटन दिसेल त्यावर क्लिक करा
- आता Go प्लॅन निवडला की तो आपोआप फ्री दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे Credit/Debit कार्ड डिटेल्स किंवा UPI (PhonePe, GPay, etc) मार्फत AutoPay सेटप करावं लागेल.
- हे करताना पैसे जाणार नाहीत मात्र १२ महिने पूर्ण होण्याच्या काही दिवस आधी AutoPay बंद करायला विसरू नका.
Login to chatgpt.com > Click Upgrade for Free > Add Payment Details > ChatGPT Go Activated
भारतामध्ये AI चा वापर झपाट्याने वाढतोय. अशा वेळी OpenAI ने ChatGPT Go मोफत करून भारतीय युजर्सना एक मोठी संधी दिली आहे. ज्यांना AI च्या प्रीमियम फीचर्सचा अनुभव घ्यायचा आहे, गेले काही दिवस AI कंपन्या भारतीय ग्राहकांना त्यांच्याकडे वळवण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. अर्थात यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीयांना ती गोष्ट मोफत उपलब्ध करून देणे.
आधी Perplexity Pro + Airtel ऑफर त्यानंतर Google Gemini ने विद्यार्थ्याना एक वर्ष मोफत सेवा जाहीर केली आणि आता ChatGPT GO. यानंतर Jio ने सुद्धा गूगलसोबत भागीदारी करत १८ महिने Google Gemini Pro मोफत देणार असल्याचं सांगितलं आहे!









