अ‍ॅपलने लाँच केला सर्वात स्वस्त iPhone आयफोन ५ एस आयफोन-5सी


 अ‍ॅपलने पहिल्यांदाच एकाच वेळी आयफोनची दोन मॉडेल्स लाँच केली आहेत. पहिले आहे आयफोन-5 एस, दुसरे आयफोन-5 सी. प्लॅस्टिक बॉडी असलेला हा फोन तुलनेत स्वस्त आहे. आयफोन-5एस तीन रंगांत तर 5 सी हा पाच रंगांत आहे. आयफोन-5 एस आधीच्या मॉडेल्सपेक्षा दुप्पट वेगवान असल्याचे कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी फिल शिलर यांनी सांगितले. कंपनीचा व्यवसाय इतका वाढला आहे की यावेळी दोन आयफोन लाँच करावे लागले, असे ते म्हणाले.




आयफोन-5सी च्या किंमती 6,300 ते 13 हजार रुपयांदरम्यान असेल. Without contract 
आयफोन-5 एस ची किंमत 13 ते 26 हजारांदरम्यान असेल. 
त्यांची बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही किंमत अमेरिकेत असेल.




For iPhone 5C : — 16 जीबी : 6300 रुपये, 32 जीबी : 13000 रुपये Without Contract 
                              With Contract around Rs 25000 किंमत असणार आहे.
For iPhone 5S : — Without Contract around 25000-30000 
                              With contract around 45000….
(For these iPhone its compulsory to subscribe to contract)
That means no iPhone is still cheap 🙁
                                                                                                                               ”   

आयफोन ५ एस


हा पहिला स्मार्ट फोन आहे ज्यात ६४ बीटची चीप असली तरी ३२ बीटवर चालणारी सर्व अॅप्स यात चालतील. या फोनमध्ये ए ७ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा प्रोसेसर पहिल्या आयफोनच्या प्रोसेसरपेक्षा ५६ पट जास्त वेगाने काम करतो, असे अॅपल कंपनीने सांगितले. हा फोन स्पेस ग्रे, पांढ-या आणि बबली शॅम्पेन रंगात सादर करण्यात आला आहे. हाय ग्रे अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेले या फोनचे मॉडेल आयओएस ७ या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) काम करते.


गेमिंगसाठी आयफोन ५ एस मध्ये ओपन जीपीईएस ३.० सिस्टिम आहे. या सिस्टिममुळे स्मार्टफोनवर खेळता येणारे अनेक प्रकारचे गेम या आयफोनवर खेळता येतील. या आयफोनमध्ये अॅपल कंपनीचीच ५ एलिमेंट लेन्स आहे. फोनच्या सेन्सरचा आकार आधीच्या आयफोनमधील सेन्सरचा आकार आधीच्या फोनमधील सेन्सरपेक्षा १५ टक्के जास्त मोठा आहे. शिवाय आयफोन ५ एसमध्ये एफ/२.२ अॅपार्चर आहे.


आयफोन ५ एस ची बॅटरी थ्री जी सेवा वापरल्यास सलग दहा तास काम करते फोर जी एलटीई सेवा वापरल्यास दहा तास मोबाइलव्दारे इंटरनेट ब्राउझिंग करता येते किंवा सलग दहा तास व्हिडिओ बघता येतो. या फोनचा स्टँडबाय टाइम २५० तासांचा आहे. या फोनचे १६ जीबी क्षमतेचे मॉडेल भारतात १९९ डॉलरमध्ये (सुमारे १३ हजार रुपये) उपलब्ध आहे. तसेच आयफोन ५ एसचे ३२ जीबी क्षमतेचे मॉडेल भारतात २९९ डॉलरमध्ये (सुमारे २० हजार रुपये) उपलब्ध आहे. आयफोन ५ एसचे ६४ जीबी क्षमतेचे मॉडेल भारतात ३९९ डॉलरमध्ये (सुमारे २५ हजार रुपये) उपलब्ध आहे.


आयफोन ५ सी


भारत आणि चीनमधील मध्यमवर्गासाठी म्हणून अॅपल कंपनीने आयफोन ५ सी हा कमी किंमतीचा आणि पाच रंगात उपलब्ध असलेला फोन तयार केला आहे. याचे मागच्या बाजूचे कव्हर पॉलिकार्बोनेटव्दारे तयार करण्यात आले आहे. यात ८०२.११ a/b/g/n ड्युएल बँड वाय-फाय आणि जगात कुठेही इंटरनेट सेवा वापरणे सोपे व्हावे यासाठी एलटीई (४ जी) बँड्स आहेत. याच्या १६ जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत ९९ डॉलर (सुमारे ६३०० रुपये) आणि ३२ जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत १९९ डॉलर (सुमारे १३ हजार रुपये) आहे.


आयफोन ५ सी मध्ये आयफोन ५ प्रमाणेच चार इंचाचा डिस्प्ले, ए ६ प्रोसेसर, आठ मेगापिक्सल्सचा कॅमेरा, फोनच्या पुढच्या बाजूस व्हिडिओ चॅट किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यासाठी एक एचडी कॅमेरा आहे. हा कॅमेरा अंधुक प्रकाशातही दर्जेदार काम करतो, अशी माहिती अॅपल कंपनीने दिली.


कंपनीने आयफोन ५ सी साठी २९.९९ डॉलरचे (सुमारे दोन हजार रुपये) सहा रंगाचे कव्हर सादर केले आहेत. या फोनची मागची बाजू अतिशय गुळगुळीत आणि सॉफ्ट मॅट फिनिशिंग केलेली अशी आहे. हा फोन आयओएस ७ या ऑपरेटिंग चालतो.
हाती आलेल्‍या वृत्तानुसार अ‍ॅपलचा हा आयफोन 5सी अनेक मीडियम बजेट फोनप्रमाणेच प्‍लास्टिक केसबरोबर बाजारात येईल. त्‍याचबरोबर याचा लुकही थोडासा बदलण्‍यात येणार आहे. इंटरनेटवर आलेल्‍या वृत्तानुसार या नव्‍या आयफोनची बॉडी किना-यापासून गोल, या फोनची किंमतही खूप कमी असेल. यामध्‍ये आयफोन 5 सारखा कॅमेरा असून यामध्‍ये एलईडी फ्लॅशची कमतरता आहे.


फोर्ब्‍स मॅगझीनच्‍या मते, या फोनमध्‍ये 16 जीबी आणि 32 जीबी मेमरी असेल.  कदाचित 16जीबी असण्‍याची शक्‍यता आहे. अ‍ॅपल आपल्‍या युजर्सला मेमरी कार्ड लावण्‍याची परवानगी देत नाही. या फोनची किंमत सुमारे 400 ते 500 डॉलर असण्‍याची शक्‍यता आहे (म्‍हणजेच 26 ते 30 हजार रूपये). जुना आयफोन 5 भारतात अजूनही 46 हजार रूपयांना विकला जातो. त्‍याच्‍या तुलनेत 5 सी हा खूप स्‍वस्‍त मानला जाईल.



1.फिंगरप्रिंट स्‍कॅनर  : अ‍ॅपलचे सिग्‍नेचर डिव्‍हाईस असलेल्‍या आयफोनमध्‍ये प्रत्‍येकवेळी काहीतरी नवीन पाहायला                                    मिळते. आता नव्‍या आयफोन 5 एसमध्‍ये फिंगरप्रिंट स्‍कॅनर सुविधा मिळण्‍याची शक्‍यता आहे. या फिचरच्‍या मदतीने फोनच्‍या सुरक्षततेत  आणखी वाढ होईल. त्‍याचबरोबर फिंगर‍प्रिंट  स्‍कॅनरला हॅक करणे साधारण स्‍मार्टफोनच्‍या तुलनेत थोडे कठीण असेल. सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने पा‍हिल्‍यास हे फिचर फोनला आणखी सुरक्षित ठेवेल. या फोनच्‍या फिचर्सबाबतीत इंटरनेटवर मोठया प्रमाणात चर्चा होत आहे. आतापर्यंत या फोनची जितकेही फोटो रिलीज झाले आहेत. यामध्‍ये होम बटन स्‍पष्‍ट दिसून येते. काही ठिकाणी आलेल्‍या वृत्तानुसार सफायर होम बटन असल्‍याचे म्‍हटले आहे. गेल्‍यावर्षी रिलीज झालेल्‍या आयफोन 5मध्‍ये आधीपासूनच सफायर एलईडी फ्लॅशवाला कॅमेरा होता. आता या नव्‍या फोनमध्‍ये कशाचा समावेश केला आहे, ते पाहावे लागेल.

Exit mobile version