नोकियानं आणले दोन स्वस्त कॅमेरा मोबाइल

nokia108स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंगकडून मार खाल्ल्यानंतर नव्या जोमानं कामाला लागलेल्या नोकियानं आता गरीब आणि मध्यमवर्गीय मोबाइल ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त कॅमेरा फोन बाजारात आणले आहेत. नोकिया १०८ आणि नोकिया १०८ ड्यूएल सिम या दोन नवीन फोनची घोषणा कंपनीनं केली आहे आणि त्याची किंमत १८०० रुपयांपेक्षाही कमी असणार आहे.

भारतीय मोबाइल बाजारपेठेतील अव्वल स्थान सॅमसंगकडून पुन्हा मिळवण्यासाठी नोकिया कंपनी सध्या नवनवे प्रयोग करताना दिसतेय. नोकिया ल्युमिया ही विंडोज फोनची सीरिज, नोकिया आशा ५०१ ची कलरफूल रेंज बाजारात आणून त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यानंतर आता, पहिला कॅमेरा मोबाइल घेणा-यांसाठी ते दोन चकाचक फोन घेऊन येताहेत. 

नोकिया १०८ मध्ये ०.३ मेगापिक्सल कॅमेरा असून हा फोन फक्त १८०० रुपयांना बाजारात उपलब्ध होणार आहे. हा कॅमेरा अगदीच प्राथमिक स्तराचा (व्हीजीए) आहे. मात्र या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला असल्यानं या मोबाइलची मेमरी ३२ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. या मोबाईलमध्ये एमपीथ्री प्लेअर आणि एफएम रेडीओही असून नोकियाच्या सुरुवातीच्या काळातील फोनमध्ये असलेला स्नेक गेमही या मोबाईलमध्ये देण्यात आला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या मोबाइलची ९५० एमएएच बॅटरी ३१ दिवस चालू शकते. एकदा मोबाइल चार्ज केल्यावर आपण त्यावर १३.८ तास बोलू शकतो आणि ४१ तास गाणी ऐकू येऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. सुरुवातीला हा मोबाइल लाल, पांढ-या आणि काळ्या रंगात उपलब्ध असून काही दिवसांनी पिवळा आणि सियान कलरमध्येही ही मॉडेल उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल वैशिष्ट्य

आकार- ११०.४ (लांबी) X ४७ (रुंदी) X १३.५ (जाडी) (मीलीमीटर्समध्ये)
वजन – ७० ग्रॅमहून कमी
स्क्रीन – १.८ इंच ६४ के एलसीडी डिस्प्ले
स्क्रीन रेझोल्यूशन – १६०X१२८ पिक्सल्स

Exit mobile version