गुगलचा नेक्सस ५ लाँच, आठवडाभरात भारतात येणार

महिन्याभरापूर्वीच आपल्या नवीन अॅन्ड्रॉइड ४.४ किटकॅट व्हर्जनची घोषणा केल्यानंतर गुगलने पहिल्यांदाच ही ऑपरेटिंग सिस्टीम असणारा नेक्सस ५ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. एलजी कंपनीने तयार केलेला हा फोन १६ जीबी आणि ३२ जीबीच्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या आठवड्यात हा फोन भारतात २८ हजार ९९९ (१६ जीबी) आणि ३२ हजार ९९९ (३२ जीबी) रुपयांना विकत घेता येणार आहे. 

गुगलच्या नेक्सस ५ मधील अॅन्ड्रॉइड ४.४ किटकॅट व्हर्जनमुळे युझर्सला फक्त महत्वाची माहिती शो करुन गरजेची नसणारी माहिती लपवता येणार आहे. तसेच गुगलने सुरु केलेल्या सर्व नविन सर्व्हिसेस नेक्सस ५मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 
गुगल हॅगआऊट अॅप्स, एसएमएस, एमएमएस सर्व्हिसेससहीत कॉनव्हर्सेशन आणि व्हिडीओ कॉलिंगही वन टच क्लिकने वापरता येणार आहेत. वायरलेस चार्जिंग बॅटरी हेही गुगल नेक्ससचे अनोखे वैशिष्ट्य आहे. नेक्सस ५ 
हा पहिलाच किटकॅट अॅन्ड्रॉइड फोन असला तरी लवकरच ही सिस्टीम नेक्सस ४, नेक्सस ७, नेक्सस १० सहित सॅमसंग गॅलेक्सी एस फोर आणि एचटीसी वनमध्येही उपलब्ध होणार आहे. 

एलजी गुगल नेक्सस ५चे टेक्निकल स्पेसिफिकेशन 

स्क्रीन 

आकार – ४.९५ इंच फूट टच एचडी रेझोल्यूशन – १९२० x १०८० (४४५ पीपीआय) डिसप्ले- गोरीला ग्लास थ्री 

ऑपरेटिंग सिस्टीम 

अॅन्ड्रॉइड ४.४ किटकॅट 

प्रोसेसर क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन ८००, २.३ जीएचझे क्वाड कोअर अॅड्रेनो ३३०, ४५० एमएचझे जीपीयू 

कॅमेरा 

रेअर व्ह्यू – ८ मेगापिक्सल्स, ऑप्टिकल इमेज स्टॅबलायझर फ्रण्ट – १.३ मेगापिक्सल्स 

मेमरी 

१६ किंवा ३२ जीबी इंटरनल मेमरी २ जबी रॅम 

कनेक्टीव्हीटी 

ड्यूएल बॅण्ड वायफाय (२४जी/५जी) थ्रीजी तसेच फोर जी सपोर्ट 

बॅटरी २३०० एमएएच बॅटरी ३०० तास स्टॅण्डबाय टाईम 

वजन – १३० ग्रॅम आकार – ६९.१७ (रुंदी)x १३७.८४ (लांबी)x ८.५९ (जाडी) (एमएम मध्ये) 

google-launches-nexus-5
nexus 5 details android kitkat

Exit mobile version