टॉप फाइव्ह ट्रेंड्स २०१३!

सरत्या वर्षांत अनेक गॅजेट्स, अॅप्स अन् गेम्सनी टेक्नोप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यावर ‘ मटा ‘ च्या ‘ टेक्नो टीम ‘ ने टाकलेला हा दृष्टिक्षेप … 


* गेम्स… 


कँडीक्रश सागा की सब-वे सरफेस? २०१३मध्ये तुमच्या ग्रुपमध्ये कुठल्या गेम्सची जास्त क्रेझ होती. तुमच्या मोबाइलमध्ये अन् अँड्रॉइड, आयट्यून्सवर हिट ठरलेल्या यंदाच्या वर्षातील अव्वल पाच गेम्सचा आढावा घेतला आहे पराग मयेकर यांनी… 




कँडिक्रश सागा 


‘ कँडीक्रश सागा ‘ मधून अस्सल गेमर्सचा खरा कस लागतो, कारण इथे ४००पेक्षा जास्त ‘ लेवल्स ‘ गाठण्याची संधी गेमप्रेमींना मिळते. बरं या गेममधील ‘ क्वेस्ट ‘ आणि ‘ कलरवील ‘ या बाबींमुळे तुम्हाला अधिकाधिक थ्रिलर अनुभवायला मिळते. दोघांमध्ये म्हणजेच मित्रांसह हा खेळ खेळायचा असेल, तर तुमच्या फेसबुकशी हा गेम कनेक्ट करा. यामुळे हा गेम अधिक रंजक होतो. रीसेंट अपडेटमध्ये ड्रीमवर्ल्ड नावाचा नवीन भाग या गेममध्ये आणला आहे. यातही विविध ‘ लेवल्स ‘ आहेतच. 


सबवे सरफर्स 


सबवे सरफर्सबद्दल सगळेच जाणतात. पोलिसाला चकवा देत, लोकल्सवर लक्ष देत धावायचे. २०१२ पासून २०१३ पर्यंत ह्या गेमने अनेक देश गाठले आहेत. बरं प्रत्येक सणांचा या गेममध्ये समावेश असतोच. आता सबवे सरफरमध्ये लंडनच्या ख्रिसमसची मजा सुरू आहे. नवीन फीचर्सचा गेममध्ये समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, काही दिल्या गेलेल्या वस्तूंचा साप्ताहिक शोध लावल्यास तुम्हाला एक छुपा हॉलिडे गिफ्ट मिळू शकेल.


अँग्री बर्ड्स- स्टारवॉर्स २ 


काही गेम्स हे फक्त पुरुषांमध्येच लोकप्रिय होतात. अँग्री बर्ड्सच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. हा खेळ महिलांमध्येही खूप लोकप्रिय आहे. हा गेम हा स्टार वॉर्सवर बेतला आहे. अँग्री बर्डसच्या इतर गेमप्रमाणे हादेखील २०१३ मध्ये ‘ सुपर हिट ‘ ठरला. ४०पेक्षा जास्त ‘ लेवल्स ‘ गाठणे हे प्रत्येकासाठी आव्हानात्मक आहेच. बर ठराविक ‘ लेवल्स ‘ गाठल्यानंतर अधिक फीचर्स अनलॉक करता येतील. 


तीन पत्ती- इंडियन पोकर 


‘ तीन पत्ती बाय-अॅक्रो ‘ हा लाइव्ह ऑनलाइन कार्ड गेम आहे. जगभरातील रियल प्लेअर्ससह तुम्ही खेळू शकतात. यात एका टेबलवर ५ प्लेअर्स खेळू शकतात. अन् ज्याच्याकडे बेस्ट हॅण्ड असतील तो जिंकला. यात ‘ मल्टिप्लेअर ‘चा पर्याय असल्याने तुम्ही कम्प्युटर व फेसबुकवर मित्रांसह खेळू शकता. 


इंटू द डेड 


‘ इंटू द डेड ‘! नावावरूनच खेळातील थरार स्मार्ट फोनप्रेमींच्या लक्षात आला अन् अनेकांनी याला डाऊनलोड केले. या गेममध्ये तुम्हाला झोम्बीजपासून वाचून पळत राहायचे आहे. या पळापळीत तुमच्या सोबत विविध शस्त्रही असतात. गेममध्ये तुम्हाला ध्येय दिली गेली असतात. ती गाठण्यासाठी मग तुमची धावपळ सुरू होते. बरं फक्त पाठीमागे पडलेल्या झोम्बीपासूनच वाचणे हेच तुमचे ध्येय नाही, तुमच्या समोर मध्येच एखादा राक्षस उभा राहून शकतो. हे टाळायचेय मग पळत राहा… 


२०१३ मधील इतर हिट गेम्स: धूम ३, आस्फॉल्ट ८- एरबॉर्न, डेस्पिकब्ल मी, द सिंप्सन, प्लँट वर्सस जॉनबिज यांनीही गेमच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. 


*गॅजेट्स 


गॅजेट्स म्हणजे सध्या फॅशन स्टेटमेंट झाले आहे. २०१३मध्ये अशाच काही गॅजेट्सनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. सरत्या वर्षातील अशा अव्वल पाच गॅजेट्सचा आढावा घेतला आहे जयंत चौगुले यांनी. 


लूक्झी एलएक्सटू व्हि‌डीओ कॅम 


ज्यांना व्हिडीओ रेकॉर्ड करायला आवडते किंवा कॅमेरा वापरायला आवडतो त्यांच्यासाठी हे गॅजेट पर्वणी ठरले. फक्त हा कॅम कानाला किंवा खिशाला लावा आणि करा रेकॉर्डिंग. या कॅमच्या मदतीने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ तुम्ही काही सेकंदात सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करू शकता. 


आयफोन ५एस 


गजेट्सची चर्चा रंगलीय अन् अॅपलचे नाव घेतले नाही, असे होणारच नाही. सरत्या वर्षातील सप्टेंबरमध्ये अॅपलने बाजारात आणलेले आणि सर्वात जास्त चर्चेत असलेले गजेट म्हणजे आयफोन ५एस. उत्कृष्ट हार्डवेअर, वापरायला सोपी अशी आयओएस सेव्हन, ८ मेगापिक्सेलचा अफलातून कॅमेरा या ‌फीचर्समुळे आयफोन ५एस बाजारात ‘ सुपर हिट ‘ ठरला. 


एक्सबॉक्स ७२० 


हातात मावणारे गेमिंग कन्सोल ही गेमप्रेमींची पहिली पसंत असते. २०१३मध्ये आलेले एक्सबॉक्स ७२० हे असेच एक गेमिंग कन्सोल ठरले. यात क्वाड कोर प्रोसेसरसह आठ जीबी रॅम दिला आहे. या सगळ्या तगड्या हार्डवेअरमुळे एक्सबॉक्स ७२० ‘ निन्तेन्डो डब्लूआयआय ‘ पेक्षा सरस ठरतो. 


बेसिस बँड 


‘ फिट अँड फाइन ‘ राहायचे असेल तर मग बेसिस बँड मस्ट. या गॅजेटच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराची विशेष काळजी घेऊ शकता. हृदयाचे ठोके असतो किंवा शरीरात होणारे विविध बदल हे गॅजेट अचूक नोंदवून घेते. तुमच्या वर्कआउटचे रुटीनही या गजेटच्या मदतीने ठरवू शकता. बरं यात अलार्मचीदेखील सोय आहेच. 


आयऑन डॉक्स २ गो 


यंदाच्या वर्षांतील टॉप फाइव्ह गॅजेट्समधील शेवटचे गॅजेट आहे आयऑन डॉक्स २ गो. वापरायला सोपे आणि कुठे ही नेता येण्याजोगे. याच्यामदतीने तुम्ही फोटो, कागदपत्रे स्कॅन करू शकता. 




* अॅप 


ब-याचदा आपण अॅप स्टोअर किंवा गुगल प्ले मधून अॅप डाऊनलोड करतो, अन् नंतर आपल्या लक्षात येते की हे आपले फारसे चांगले नाही. असे अॅप मग आपल्या स्मार्टफोनमधून लगेच डिलीटही होतात. काही अॅप मात्र आपल्याला खूप उपयुक्त ठरतात. यंदाच्या वर्षात आलेल्या अशा काही लोकप्रिय अॅपचा आढावा घेत आहेत चैतन्य साळगावकर… 


कॉल आयडेंटिफिकेशन 


हे खऱ्या अर्थाने पुरस्कार विजेते अॅप म्हणावे लागेल. ज्यामध्ये तुमच्या स्मार्ट फोनची रिंग वाजत असताना तुम्ही कॉलरचे नाव, पत्ता आणि उपलब्ध असल्यास इतर माहिती स्क्रीनवर पाहू शकता. अनेकदा आपल्याला अनोळखी नंबर्सवरून फोन येतात, अशा व्यक्तींची माहिती कॉल आयडेंटिफिकेशनवरून‌ मिळते. जगातील कुठल्याही नंबरची माहिती तुम्ही या अॅपमुळे अगदी मोफत मिळवू शकता. बरं तुमची कॉन्टॅक्ट लिस्टही या अॅपमुळे अपडेट होत राहते. यात तुम्ही कॉन्टॅक्ट बॅकअपही ठेवू शकता. त्यामुळेच यंदा हा अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या मोठी होती. 


न्यूजहंट 


भारतातील प‌हिल्या क्रमांकाचा न्यूज अॅ‌प्लिकेशन म्हणून ‘ न्यूजहंट ‘ ची ओळख निर्माण झाली आहे. यामुळेच यंदा बरीच बक्षिसेदेखील या अॅपनी मिळवली. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास ८५पेक्षा जास्त दैनिके तुम्ही वाचू शकता. इंग्रजी व्यतिरिक्त १० भाषांमधील दैनिके या अॅपवर उपलब्ध आहेत. शिवाय ब्रेकिंग न्यूजचे अॅलर्टही वेळोवेळी मिळत राहतात. न्यूजहंटवर तुम्ही अनेक ई-बुक्स वाचू शकता. त्यांची ऑनलाइन खरेदीही या अॅपवरून शक्य आहे. अँड्रॉइड व आयओएसवर हा अॅप उपलब्ध आहे. 


पेटीएम 


बऱ्याचदा तुम्हाला दुकानातही रिचार्ज मिळत नाही. अशावेळी पेटीएम हा रिचार्जसाठी उत्तम पर्याय आहे. गुगल प्लेवरील ‘ बेस्ट युटिलीटी ‘ अॅप म्हणून हे प्रसिद्ध आहे. पेटीएमद्वारे तुम्ही तुमचे रिचार्ज, बिल पेमेंट्स क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरू शकता. तुमच्या ऑपरेटरच्या खास रिचार्ज, फुल टॉकटाइम्स, डेटा प्लान्सच्या ऑफर्स याचे अपडेट्स पेटीएम वेळोवेळी देत राहतो. 


ड्रॉपबॉक्स 


तुमच्या डेटाचा सर्ववर बॅकअप ठेवायचा असेल, तर ड्रॉपबॉक्स हे अॅप्लिकेशन स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करा… ड्रॉपबॉक्सवर तुम्ही तुमच्या महत्त्वाचे फोटो, व्हिडीओ तसेच डॉक्युमेंट्स स्टोअर करून ठेवू शकता. इथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स एडिटही करू शकता. याबरोबरच ई-मेलद्वारे येणारे डॉक्युमेंट्सही ड्रॉपबॉक्समध्ये थेट सेव्ह होण्याचा पर्यायही या अॅपमध्ये उपलब्ध आहे. 


झोमॅटो 


तुमच्या जवळपासच्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही झोमॅटो हे अॅप्लिकेशन वापरू शकता. तुम्हाला हव्या असलेल्या हॉटेल्सचे नाव, लोकेशन्स तिथे कुठल्या प्रकारचे खाद्य पदार्थ मिळतात, याद्वारे शोधू शकता. एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड, तिथले फोटोज, तिथे कसे जायचे, त्यांचा संपर्क, त्या हॉटेलचे युजर्स, रिव्ह्यू आणि रेटिंग आदी सर्वच गोष्टींची तुम्ही झोमॅटोवर माहिती मिळवू शकता. हे अॅप अॅपल, अँड्राँइड, विंडोज, ब्लॅकबेरी या स्मार्ट फोनसाठी उपलब्ध आहे.

Other Famous apps n games :

Games :====Dhoom3 The Game, krrish 3 The Game, Channai Express Game, Dr.Driving,Chhota Bheem, Shiva The Time Bender(Latest Hit),Clash of Clans, Hey Day, FIFA14,Temple Run OZ, Despicable Me, CSR Racing,RayMan,Fruit Ninja,AngryBirdsGo

Apps :====hike messenger, Clean Master,Line, WeChat, Viber, Camscanner, pixlr Express, Nexgtv, m-indicator,BBM, SuperBeam, Smart Tools, Runtastic,MX Player, RealCalc, Next launcher, SkecthBook Mobile

Exit mobile version