5 इंच स्क्रिन असणारा Lumia Icon लॉन्च, यात आहे 20 मेगापिक्सलचा कॅमेरा

5 इंच स्क्रिन असणारा Lumia Icon लॉन्च, यात आहे 20 मेगापिक्सलचा कॅमेरा
Nokia Lumia Icon

NOKIA ने आणखी एक विंडोज स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या मोबाइलचा कॅमेरा याचे खास वैशिष्ट आहे. Nokia Lumia Icon मध्ये चार मायक्रोफोन लावण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये सहसा एक किंवा दोन मायक्रोफोन्स असतात. फोन आल्यानंतर समोरच्या बाजूला असणारे मायक्रोफोन अ‍ॅक्टीव्ह होतील तर मागच्या बाजूचे मायक्रोफोन व्हिडीओ रेकॉर्ड करताना अ‍ॅक्टीव्ह होतील. या मधील सर्वात खास गोष्ट म्हणजे याचा 20 मेगापिक्सलचा कॅमेरा.

Verizon आणि Nokia मिळून हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. फिचर पहिले तर याची म्युझिक क्वॉलीटी जबरदस्त आहे. हा स्मार्टफोन अमेरिकेत लॉन्च झाला असून लवकरच भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे. 

Lumia Icon

कोणताही स्मार्टफोन घेताना सर्वात आधी आपण त्याचा कॅमेरा पाहत असतो.Lumia Iconमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आला आहे ज्याच्या मदतीने 19 मेगापिक्सल रिझल्युशन  असणारे फोटो काढता येतात. याअधी Nokiaच्या Lumia 1020 मध्ये 41 मेगापिक्सल असणारा कॅमेरा आहे ज्यमध्ये 38 मेगापिक्सल रिझल्युशन असणारे फोटो काढता येतात. हा नवीन स्मार्टफोन Lumia 1020 टक्कर देउ शकत नसेल तरी हा मोबाइल Sony च्या xperia सिरिजच्या सर्व ,स्मार्टफोन्सना मागे टाकतो.
Nokia चा हा स्मार्टफोनही विंडोच ऑपरेटिंग सिस्टमवर अधारित आहे. याची 5 इंच स्क्रिन  1080 पिक्सल रिझल्युशन देते. यात 32GBची मेमरी आहे जी वाढवता येणार नाही. यात मेमरी कार्डचा पर्याय नसला तरी या मोबाइसोबत Microsoft च्या  SkyDrive वर 7 GB फ्री स्टोअरेज मिळत आहे. या मोबाइलमध्ये  2.2 GHzचे क्वॉल-कॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे.

अमेरिकेन बाजारपेठेत हा स्मार्टफोन 20 फेब्रुरवारीपासून उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची किंमत  200 डॉलर म्हणजेच जवळजवळ 12,452 रुपये आहे. Apple च्या Iphone प्रमाणेच हा मोबाइलही केवळ दोन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर मिळेल. कॉन्ट्रॅक्टची वेळ संपल्यानंतर युजर्सना पुन्ही पैसे भरावे लागतील. Nokia च्या या स्मार्टफोनसोबत वायरलेस चार्जर आणि अनेक अ‍ॅक्सेसरीज मिळत आहेत. 

Exit mobile version