हिट है यह! टाइमपास इफेक्ट !!!!!

वैभव मांगले Timepass मूवीमध्ये  

खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये कुणीतरी विचारतं, ‘ठाणे कुठल्या बाजूला येईल हो?’. त्याला उत्तर दिल्यावर गर्दीत एखादा म्हणतो, ‘जाने दो, नया है वह’ आणि हशा पिकतो. ‘टीपी’तल्या या डायलॉगने सध्या जि‌थे-तिथे धुमाकूळ घातलाय. एफबीवर त्याची पेजेस बनली असून त्याला हजारोंनी लाइक्स आहेत.

कधीतरी वर्गात पहिल्यांदाच दिसणाऱ्या मुलाला ‘तू मला पहिल्यांदाच माझ्या वर्गात दिसतोयस’ असं शिक्षक विचारतात. मग मागच्या बाकावरची सर्व मुलं कोरसमध्ये सुरू होतात…’जाने दो मॅम, नया है वह’. एखादा माणूस असंबद्ध बडबड करीत असेल तर, ‘मैं क्या बोल रहा हूं, तू क्या बोल रहा है?’ असा डायलॉग मारत त्याची बोलती बंद केली जाते. ट्रॅफिक हवालदाराने पकडल्यानंतर ‘जाने दो ना सर, नया है वह’ असा डायलॉग मारला जातो. अशा एक ना दोन, अनेक प्रसंगी सध्या ‘टीपी’मधले हे डायलॉग्ज कानांवर पडतायत.

एखादा सिनेमा आला की त्याचे डायलॉग्ज आणि गाणी तरुणाईच्या डोक्यात घर करुन जातात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास’मधल्या ‘नया है वह’ या डायलॉगने तर तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, कॉलेज कट्टा, ट्रेनपासून ते अगदी क्लासरुम आणि घरातही या डायलॉगचा ‘परफेक्ट’ वापर करून अनेकांचा मस्त टाइमपास होतोय.

सोशल नेटवर्किंगवरही हिट

‘नया है वह’ या नावाने सध्या फेसबुकवर एक डझनहून अधिक फॅन पेजेस आहेत. या पेजेसच्या लाइक्सची संख्या हजारोंमध्ये असून, रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आधारित ‘नया है वह’ पोस्ट केलं जातं. ही सर्व पेजेस हिट होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे वैभव मांगले यांनी साकारलेली लेले ही व्यक्तिरेखा. अनेक मराठी माणसं हिंदी बोलताना अनेकदा, ‘वह’, ‘वहां’, ‘कैसे’ यासारख्या शब्दांवर उगाचच जोर देतात. ते ऐकताना मजेशीर वाटतं. हिच गंमत वैभव यांनी पडद्यावर मस्त उतरवल्यामुळेच आज हा डायलॉग इतका लोकप्रिय झाल्याचं पेज अॅडमिन्स सांगतात.

हिंदी विद्यार्थीही फॅन

कॉलेजच्या कट्ट्यांपासून ते अगदी लेक्चर्स प्रॅक्टिकल्सपर्यंत सगळीकडेच ‘नया है वह’ हिट ठरत आहे. असा एकही दिवस सध्या कॉलेजमध्ये जात नाही जेव्हा आम्ही ‘नया है वह’ हा डायलॉग ऐकत नाही असे म्हणणारे अनेक विद्यार्थी आहेत. ‘अनेक हिंदी मुलंही मुद्दाम ‘नया है वह’वर जोर देत वर्गात मस्करी करत असतात. अनेकांनी मराठी मुलांमध्ये हा डायलॉग का हिट आहे हे जाणण्यासाठी टीपीमधला तो सीन आम्ही युट्यूबवर पाहिला असं ती मुलं सांगतात,’ असं संस्कृतच्या शिक्षिका वैदेही जोशी यांनी सांगितलं.

फेसबुकवरील काही हिट पेजेस

नया है वह क्या नया है वह ४८ हजार लाइक्स

क्या नया है वह ३३ हजार लाइक्स

नया है वह ८ हजार लाइक्स

मेसेजेस…स्टेटस…गाणी

व्हॉट्सअॅपवरही ‘हम गरीब हुअे तो क्या हुआ’चा संपूर्ण डायलॉग वेगवेगळ्या प्रकारे फिरताना दिसत आहे. तसेच ‘टीपी’मधल्या गाण्याची, शब्द बदलून तयार केलेली नवीन गाणीही व्हॉट्सअॅपवर हिट आहेत. एखाद्याने टायपिंगमध्ये काही चूक केली किंवा एखाद्या विषयावर चर्चा होत असताना कुणी नव्याने जॉइन झालेला मेंबर काहीतरी बोलला तर ‘नया है वह’ असं म्हणत त्याची फिरकी घेतली जाते. अनेकजण ‘नया है वह’च्या कस्टमाईज्ड मेसेजेसचे फोटोही ग्रूपवर पोस्ट करतात.

Exit mobile version