फेसबुकच्या Free Basics ला सपोर्ट करू नका !

फेसबूकने यापूर्वी internet.org नावाची योजना आणली होती. ज्यामध्ये तुम्हाला काही वेबसाइट इंटरनेट भाड्याशिवाय पाहता येत होत्या मात्र त्यासाठी तुम्हाला केवळ रिलायन्सचंच कार्ड घेऊन त्यांचा एक पॅक घ्यावाच लागतो. मग तुम्हाला त्या वेबसाइटचं साधं version फुकट पाहता येतं. ह्यामुळे सरकारी नियम भंग होत असून सर्वांना समान इंटरनेट हक्क मिळण्याच्या विरोधात हा प्रकल्प आहे. यावेळी त्यांनी internet.org ला Free Basics या नावाने सादर केलय.
आता पुन्हा फेसबूकने पुन्हा वापरकर्त्यांना शब्दांमध्ये गुंतवून शुद्ध फसवणूक करत फेसबूक वापरणार्‍या लोकांना त्यांच्या बाजूने ईमेल पाठवण्यास परावृत्त केलं आहे. 
मराठीटेकचा यापूर्वीचा लेख नक्की वाचा नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय ? 
ह्या स्क्रीनवरून Send Mail हा पर्याय वापरू नका !

 ह्या मोहिमेला सपोर्ट करावयाचा का नाही ते तुम्ही खालील मुद्दे वाचून ठरवा…..

  • ह्या प्रकल्पाचा आणि डिजिटल इंडियाचा काडीचा संबंध नाही   !
  • Free Basics मुळे तुम्हाला फुकट इंटरनेट मिळत नाही !
  • याचा वापर करण्यासाठी फक्त रिलायन्सच्याच नेटवर्कचा वापर करावा लागतो मग हा प्रकल्प सर्वांसाठी चांगलं कसा असेल. यात साहजिकच फेसबूक आणि रिलायन्सचे हितसंबंध दडलेत!
  • केवळ Free Basics मुळे एकही जण इंटरनेटशी जोडला जात नाही !
  • Free Basics बंद पडल्यामुळे काहीही नुकसान होणार नाही. आपल्या देशाच्या डिजिटल प्रगतीला देखील काही एक अडचण होणार नाही.  
  • फेसबूक मुद्दाम भारतीय, भारतीय लोक, डिजिटल इंडिया असे शब्द वापरुन तुमची फसवणूक करत आहे. त्याला बळी पडू नका ! फेसबूक म्हणजे धुतलेला तांदूळ नाही, त्यांचे सुद्धा डावपेच आहेत!
  • तुम्ही http://www.savetheinternet.in/ या वेबसाइटवर जाऊन सर्वांना समान इंटरनेट मिळण्यासाठी TRAI ल ईमेल करा.  
“Unless you take action now, India could lose access to free basic internet services, delaying progress towards digital equality for all Indians. Tell the TRAI you support Free Basics and digital equality in India.” 
अशा शब्दात फेसबूकने वापरकर्त्यांना उघड उघडपणे फसवलं आहे. तुम्ही या गोष्टींना न फसता तो ईमेल करणं टाळा. आपल्या हक्कांविरुद्ध आहे Free Basics. आंधळेपणाने शेअर करणार्‍या आणि मेल पाठवणार्‍या मित्रांना देखील हे सांगा.     
Exit mobile version