Verizon-याहू, फ्लिपकार्ट-जबोंग, MiBook, Amazon Prime बद्दल

● Verizon या टेलीकॉम कंपनीने याहू या प्रसिद्ध सर्च इंजिन वेबसाइटला विकत घेतलंय. एकेकाळी इंटरनेटवर अधिराज्य गाजवणारी याहू कंपनी केवळ $4.8 बिलियनमध्ये विकली गेली! (WhatsApp ला फेसबुकने $19बिलियन घेतलं होतं) याहूच्या अधिकार्‍यानी गुगलला सुरवातीच्या काळात त्यांची कल्पना वापरण्यास नकार दिला. नंतर गूगल विकत घेण्याची ऑफर नाकारली. अलीकडे मायक्रोसॉफ्टने याहू विकत घेण्याची तयारी दाखवली तर तेव्हाही नकार दिला. आणि आज खूपच कमी किंमतीमध्ये ही विक्री करण्यात आली !

आता गूगल सर्व पातळीवर याहूच्या पुढे आहे (सर्च,मेल, मेसेजेस, न्यूज,इ.). इंटरनेटच्या सुरवातीच्या काळाविषयी याहूची महत्वाची भूमिका स्पष्ट करत सीईओ मेरीसा मेयर निरोपाचं पत्र कर्मचार्‍यांना दिलंय.       
(वरिष्ठ पातळीवर चुकीच्या निर्णयांचा फटका बसण्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे याहू) 
● गेल्या वर्षी फ्लिपकार्टने Clothing/फॅशन वेबसाइट Myntra विकत घेतली होती. आता मिंत्राने त्यांच्या प्रतिस्पर्धी Jabong ला विकत घेतलय !! हा व्यवहार $70मिलियनमध्ये पार पडला! स्नॅपडील, फ्यूचर ग्रुपसुद्धा या कंपनीला विकत घेण्यासाठी शर्यतीत होत्या अशी चर्चा आहे. Jabong च्या फॅशनमधील मोठ्या कॅटॅलॉगचा मिंत्राला फायदा होईल. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळाल्यामुळे जबोंगला त्यामानाने कमी किंमत मिळाली आहे.      

● शायोमी या चीनी कंपनीने चीनमध्ये त्यांचा पहिला लॅपटॉप सादर केला आहे. ह्या लॅपटॉप दिसायला अॅपलच्या मॅकबुकसारखाच असून यामध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टम आहे. 
12.5-inch Mi Notebook Air मॉडेल Intel Core M3 प्रॉसेसर सोबत 4GB RAM and 128GB SSD स्टोरेज किंमत जवळपास रु ३६,२००
13.3-inch Mi Notebook Air मध्ये Intel Core i5-6200U प्रॉसेसर, Nvidia GeForce 940MX graphics solution, 8GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज किंमत जवळपास रु ५०,२०० 
भारतात कधी उपलब्ध होणार याविषयी घोषणा नाही. 
● अमॅझोन या शॉपिंग वेबसाइटने त्यांची Amazon Prime नावाची सेवा आता भारतातसुद्धा सुरू केली आहे. या सेवेमध्ये ग्राहक वार्षिक स्वरुपात काही रक्कम देऊन प्लॅन घेतो ज्यामध्ये ग्राहकाला वर्षभर कोणत्याही वस्तूवर मोफत होम डेलिवेरी मिळते ! ती सुद्धा अवघ्या एक/दोन दिवसातच ! Prime वापरणार्‍या यूजरसाठी खास ऑफर सुद्धा असतात. यासाठी सध्या ऑफरमुळे रु. ४९९ मोजावे लागतील नंतर ह्याची किंमत ९९९ प्रतिवर्ष अशी असेल. सध्या अमॅझोन दोन महिन्यासाठी ही सेवा ट्रायलअंतर्गत मोफतच उपलब्ध करून देत आहे. लवकरच Amazon Prime विडियो सेवा सुद्धा सुरू होईल अशी घोषणा करण्यात आली आहे. 
अधिक माहितीसाठी लिंक : Introducing Amazon Prime   
● ओपेरा मिनी ह्या मोबाइल ब्राऊजरमध्ये आता विडियो डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे. यापूर्वी ह्या ब्राऊजरमध्ये Adblock (वेबसाइटवर दिसणार्‍या जाहिराती बंद्द करण्याची सोय) देण्यात आला आहे. ह्या ब्राऊजरचं वैशिष्ट्य म्हणजे हा इंटरनेट डाटा मध्ये खूप मोठी बचत करतो आणि स्लो नेटवर्कवरसुद्धा वेगात वेबसाइट लोड करतो !
डाऊनलोड लिंक : Opera Mini on Play Store 
Exit mobile version