मराठीटेक अँड्रॉइड अॅप्लिकेशन आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

मराठीटेक ब्लॉगचं अँड्रॉइड अॅप्लिकेशन ज्यामध्ये मराठीटेक पोस्ट्स अधिक चांगल्या रीतीने वाचण्याचा अनुभव मिळतो. सोबतच इतर साइट्सच्या पोस्ट्स वाचण्याची सोय  होती.  इतके दिवस तब्बल २००० हून अधिक वाचक याचा वापरसुद्धा करत आहेत. पण हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून द्या अशी अनेक वाचकांची मागणी होती. त्यामुळेच डाऊनलोड लिंक्स देण्यापेक्षा प्ले स्टोअरचा पर्याय संयुक्तिक आहे. यामार्गे अपडेट्स पुरवणं अधिक सोपं जाईल. आजपासून मराठीटेक बागलटेकचा भाग बनली असून ह्या साइटचे लेखक सूरज बागल यांची स्टार्टअप कंपनी म्हणता येईल.  याद्वारे तंत्रज्ञानाच्या भन्नाट जगाशी अधिकाधिक लोकांना जोडता येईल ह्या उद्देशाने मोबाइल अॅप्लिकेशन्स डेव्हलप करण्याचा विचार आहे.

मराठीटेक साइट आणि अॅप्लिकेशनबद्दल …
मराठीटेकला मिळालेला प्रतिसाद :      

वाचक : १,२३,४५६ +
फेसबुक लाइक्स : १,४०० +
ट्वीटर फॉलोअर्स : १४० +
यूट्यूब सबस्क्रायबर्स : १५० +

मराठीटेकचा गूगल ट्रान्सलेटमध्ये सहभाग : गूगल ट्रान्सलॅटॅथॉन २०१५ स्पर्धेत  ५००० शब्दांची भर घालत देशात सर्वप्रथम ५० मध्ये समावेश

मराठीटेक अॅपमधील सोयी :

• वेगवान अपडेटस मिळवा मराठीत

• मराठीतलं टेक्नॉलॉजीविषयी सर्वात अपडेटेड अॅप • मटेरियल डिजाइनसह अधिक थीम्स • स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर, व्हॉट्सअॅप, फेसबुक, सोशल मीडिया• नवं संशोधन, टॉप १०, वेबसाइट ओळख असे विभाग • अधिक ताज्या अपडेटसाठी इतर पोस्ट्सचा समावेश • फेसबूक पेजवरील अपडेटदेखील अॅप मधेच मिळवा • मराठीटेक : टेक्नॉलॉजीविषयक प्रश्न विचारण्याची सोय 
• यापूर्वीचं अॅप्लिकेशन २००० वाचक वापरत आहेत!

डाऊनलोड लिंक MarathiTech on Google Play
मराठीटेक अॅपबद्दल यूट्यूब व्हिडिओ!

या अॅप्लिकेशन मध्ये मराठी इंटरनेट ब्लॉगचा समावेश करण्याबद्दल रोहन जगताप यांचे आभार

वाचकांनी याआधी जसा प्रतिसाद दिला तसाच या अॅप्लिकेशनला मिळेल अशी अपेक्षा करतो.
अॅप्लिकेशन डाऊनलोड करून शेअर करायला विसरू नका. मराठी वाचकांपर्यंत अॅप पोहोचल पाहिजे हीच इच्छा, पर्यायाने अधिकाधीक मराठी बांधव टेक्नॉलॉजी जगताशी जोडले जातील!

टीप : जुन्या वापरकर्त्यांनी आधीच अॅप्लिकेशन Uninstall करून हे अॅप डाऊनलोड करावं!

Exit mobile version