मायक्रोसॉफ्टने सादर केला आहे Xbox One X : जगातला सर्वात ताकदवान गेमिंग कॉन्सोल !

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या प्रसिद्ध गेमिंग कॉन्सोल एक्सबॉक्सची पुढची आवृत्ती E3 या कार्यक्रमात सादर केली असून या नव्या गेमिंग कॉन्सोलचं नाव Xbox One X असं आहे. अनेक नव्या सुविधांसह सादर केलेल्या या कॉन्सोलला आजपर्यंतचा सर्वात ताकदवान गेमिंग कॉन्सोल म्हटलं जात आहे. 4K रेसोलुशन असलेली गेम्समधील जबरदस्त स्पष्टता ज्यामुळं गेम्सचं ग्राफिक्स अधिक खरंखुरं दिसेल!

सुरुवातीला प्रोजेक्ट स्कॉर्पिओ नावाने ओळखला जाणाऱ्या ह्या कॉन्सोलचं नाव काल जाहीर करण्यात आलं. या नव्या कॉन्सोलचं डिझाईन फारसं आकर्षक नसलं तरी यामधील अंतर्गत गोष्टी भन्नाट आहेत. दिसायला सध्याच्या Xbox One S सारखाच म्हटलं तरी चालेल! तरीही One X मायक्रोसॉफ्टचा आजपर्यंतचा सर्वात लहान कॉन्सोल आहे आणि तोसुद्धा सर्वात पॉवरफुल!

यामध्ये तब्बल 6 Teraflops ची प्रोसेसिंग पॉवर असून हा एका कस्टम GPU Engine मुळे जे 1172Mhz वर काम करतं! सध्याची Xbox ची स्पर्धा म्हणावी अशा सोनी प्लेस्टेशन 4 Pro ची प्रोसेसिंग पॉवर 4.2 Teraflops आहे!मायक्रोसॉफ्टने याच कार्यक्रमात चक्क २२ नव्या गेम्सची घोषणा करून त्यामधील काही गेम्स थेट 4K रेसोलुशनमध्ये 60FPS मध्ये खेळता येतील! (4K रेसोलुशन फुलएचडीच्या चौपट असतं!)

  

सर्वात वेगवान म्हणवला जाणाऱ्या या कॉन्सोलमध्ये एक प्रोसेसर ज्यात 7 billion ट्रान्सिस्टर आहेत, 12GB of DDR5 RAM, ८ कोअर CPU, 4K UHD/BluRay Player, GPU clocked at 1.172 GHz, 326 GB/s बॅंडविड्थ! यामधील पॉवर मॅनॅजमेन्टसुद्धा उत्तम असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे.  सोबतच यामध्ये HDR सपोर्ट सुद्धा आहे. पोर्ट्स : HDMI in/out ports, दोन USB 3.0 ports, IR Out, 1TB हार्डडिस्क, S/PDIF आणि एक Ethernet jack

Xbox One X किंमत : $499 (~ ₹ ३३,०००) 7 November 17 पासून US मध्ये उपलब्ध 

यासोबत सादर केले आहेत काही गेम्सचे डेमो व्हिडीओ ट्रेलर्स :
Forza Motorsport 7 – E3 2017 – 4K Announce Trailer
PlayerUnknown’s Battlegrounds on Xbox One – 4K Trailer
Deep Rock Galactic on Xbox One – 4K Trailer
State of Decay 2 – E3 2017 – 4K TrailerThe Darwin Project 4K Trailer
Minecraft – E3 2017 – 4K Trailer
Crackdown 3 – E3 2017 – Official 4K Trailer
Assassin’s Creed Origins: E3 2017 Official World Premiere
True 4K gaming on Xbox One X – E3 2017 – 4K Trailer
Xbox One – E3 2017 Games Montage – 4K Trailer

इलेक्ट्रॉनिक एंटरटेनमेंट एक्स्पो (E3) हा कार्यक्रम खास व्हिडीओ गेमिंगच्या विश्वातल्या मंडळींची परिषद असते. या कार्यक्रमात सोनी प्लेस्टेशन, मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स, यूबीसॉफ्ट, EA, Alienware, Dell, Nvidia, Nintendo, SEGA, Telltale, Twitch, सारखी गेमिंग विश्वातील मोठी नावं सादरीकरणासाठी भाग घेतात. Xbox One X द्वारे मायक्रोसॉफ्टने प्लेस्टेशनला सध्यातरी मागे टाकलं आहे मात्र PS4 वर अजूनही महत्वाची गोष्ट म्हणजे जबरदस्त Exclusive Games ज्या फक्त प्लेस्टेशनवर उपलब्ध आहेत अशांची संख्या जास्तच आहे. त्या बाबतीत एक्सबॉक्स अद्याप मागेच दिसून येतोय!

Exit mobile version