अॅपलचे नवे आयफोन ८, ८ प्लस व आयफोन टेन सादर

आयफोन X, आयफोन ८ प्लस व आयफोन ८ (अनुक्रमे) 

बहुप्रतीक्षित अॅपल आयफोन ८ आज अॅपलच्या नव्या अॅपल पार्क (स्पेसशीप कॅम्पस) इथल्या स्टेव्ह जॉब्स थिएटरमध्ये सादर झाला. सुरूवातीला आयफोन ८ व ८ प्लसची घोषणा करून नंतर नव्या आयफोन टेन (iPhone X) ची जाहीर करून अॅपलने चाहत्यांना सुखद धक्का दिला. आयफोनसोबतच अॅपल वॉचचीही नवी आवृत्ती सादर झाली असून अॅपल टीव्हीला आता 4K रेजोल्यूशन सपोर्ट देण्यात आला आहे! यावेळी ऑगमेंटेड रिऍलिटीवर अॅपलने भर देऊन त्यादृष्टीने काही सुविधा जोडल्या आहेत. 

आयफोन टेन (iPhone X) : ह्या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा कडा कमी असलेला डिस्प्ले, बेझेललेस डिस्प्लेची वाढती मागणी व इतर स्मार्टफोन निर्मात्यांनी (सॅमसंग,एलजी,शायोमी) आघाडी घेतल्याने शेवटी अॅपललासुद्धा बेझेललेस फोन आणावा लागला. यामुळे आयफोनचा डिस्प्ले फोनची पुढील बाजू जवळपास व्यापूनच टाकतो! केवळ इन्फ्रारेड सेन्सर, फ्रंट कॅमेरा व इतर सेन्सर यांना थोडी नाममात्र जागा जाते! होम बटन आता नसल्यामुळे स्क्रिनच्या खालच्या बाजूने वर स्वाईप केल्यास होमवर जाता येईल! सोबतच आता आयफोनवर सुद्धा वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी AirPower नावाचं नवं उपकरण देण्यात आलं आहे. एअरपॉड, अॅपल वॉच व आयफोन हे तिन्ही वायर न जोडता चार्ज करण्यासाठी वापरता येतं!
नवा आयफोन टेन भारतात ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध, २७ ऑक्टोबरपासून प्री ऑर्डर सुरु होणार आहे.        
किंमत ₹८९००० (64GB), ₹१.०२ लाख (256GB) Update : आता फ्लिपकार्टवर उपलब्ध
iPhone X Specs :
डिस्प्ले :  5.8-inch all-screen OLED HDR 3D Touch
रेजोल्यूशन : 2436-by-1125-pixel resolution at 458 ppi
प्रोसेसर : A11 Bionic chip Neural engine
कॅमेरा : 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
Telephoto: ƒ/2.4 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB
इतर : FaceID (डोळे स्कॅन करून फोन अनलॉक (फिंगरप्रिंट सेन्सर नाही त्याऐवजी Iris स्कॅनरचा वापर)
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 11

यासोबत आयफोन ८ व ८ प्लस हे यापूर्वीच्या आयफोनप्रमाणे डिस्प्ले असलेले फोनसुद्धा सादर केले आहेत.
भारतात हे दोन्ही फोन २९ सप्टेंबरपासून उपलब्ध
आयफोन ८ प्लेस फीचर्स :
डिस्प्ले :  5.5-inch widescreen LCD IPS
रेजोल्यूशन : 1920-by-1080-pixel resolution at 401 ppi
प्रोसेसर : A11 Bionic chip Neural engine
कॅमेरा : 12MP wide-angle and telephoto cameras
Wide-angle: ƒ/1.8 aperture
Telephoto: ƒ/2.8 aperture
फ्रंट कॅमेरा : 7MP camera, ƒ/2.2 aperture Animoji
स्टोरेज : 64GB/256GB रॅम : 3GB (iPhone 8 – 2GB)
इतर : TouchID फिंगरप्रिंट सेन्सर
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 11
बॅटरी : 1821mAh (iPhone 8) आणि 2675mAh (iPhone 8 Plus)
किंमत : आयफोन ८ : $699 (भारतात ₹६४००० व ₹७७०००)
किंमत :आयफोन ८ प्लस : $799 (भारतात ₹७३००० व ₹८६०००)

अॅपल वॉच सिरीज 3 सुद्धा सादर : या नव्या आवृत्तीमध्ये LTE कनेक्टीविटी देण्यात आली आहे म्हणजेच आयफोन जवळ नसला तरीही ह्या घड्याळामधील स्मार्ट सोयी आता वापरता येतील! यासाठी नॅनो सिमपेक्षाही लहान सिमचा अंतर्भाव करण्यात आला आहे.  सोबतच तब्बल ४ कोटी गाणीसुद्धा थेट ऐकता येतील. सिरी ह्या व्हॉइस असिस्टंटमुळे बोलूनच आज्ञा देता येतील! बाकी GPS, Heart Rate मॉनिटर,  Altimeter, ऍक्टिव्हिटी ट्रॅकर या गोष्टी तर आहेतच. आता बसलेल्या स्थितीत जर आपल्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये कमीजास्त झालेला बदल पाहून आपोआप नोटिफिकेशन दिलं जाईल! वॉचओएस अपडेटसुद्धा लवकरच दिलं जाईल.
अॅपल आता रोलेक्स इत्यादी घड्याळ ब्रँड्सना मागे टाकून सर्वप्रथम ठिकाणी पोचले आहेत!

अॅपल टीव्ही 4K HDR

हा आहे अॅपल टीव्ही 4K यामध्ये आता 4K HDR व्हिडिओ/कार्यक्रम पाहण्याची सोय देण्यात आली आहे. खेळ, गाणी, चित्रपट हे सर्व आता 4K क्वालिटीमध्ये उपलब्ध असतील!
 
नव्या आयफोनमध्ये Animoji नावाची एक नवी सोय असून ज्यामध्ये आपण निवडलेली इमोजी आपल्या चेहऱ्यावरील मुद्रांप्रमाणे भाव बदलेल. याचा व्हिडीओ बनवून त्याला आवाज जोडून मेसेंजरमध्ये पाठवतासुद्धा येईल!
Apple iPhone X iPhone 8 iPhone 8 Plus WatchOS Watch Series 3 Apple TV 4K HDR Steve Jobs Theater SpaceShip Campus Apple Park

Exit mobile version