सोनी, एलजी, मोटो यांचे नवे फोन सादर

IFA या युरोपमधील सर्वात मोठा तंत्रज्ञान कार्यक्रमात बर्‍याच कंपन्यांनी नवनवीन प्रॉडक्टस सादर केली आहेत. हा कार्यक्रम सध्या बर्लिन(जर्मनी) येथे सुरु आहे. यामधील काही ठळक प्रॉडक्टसबद्दल जाणून घ्या आजच्या या लेखामध्ये…
अलीकडे वाढीस लागलेला ड्युअल कॅमेरा म्हणजे फोनच्या मागे दोन व पुढे एक अशा एकूण तीन कॅमेराच्या ट्रेंडने आता सगळं मार्केट व्यापून टाकायला सुरुवात केली आहे. ड्युअल कॅमेरामधील दुसरा कॅमेरा कमी उजेडात अधिक चांगला फोटो काढता यावा किंवा फोटोची बॅकग्राउंड फोटो काढतानाच अधिक ब्लर(अंधुक) करता यावी या उद्देशाने बसवला जात आहे.

सोनी (Sony) : सोनीने त्यांच्या प्रसिद्ध एक्सपिरिया मालिकेमध्ये तीन नवे फोन सादर केले असून XZ1, XZ1 Compact व XA1 Plus अशी त्यांची नावे आहेत. यामधील XZ1 हा फोन सर्वोत्तम आहे. यामध्ये 960FPS मध्ये स्लो मोशन व्हिडीओ शूट करता येतात! असे करणारे कॅमेरे सध्यातरी फक्त सोनीचेच आहेत. सोबतच यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 3D Creator  नावाची सुविधा. याद्वारे आपण स्वतः फोनमध्येच 3D स्कॅनिंग करून 3D मॉडेल बनवू शकतो आणि नंतर ते प्रिंटसुद्धा करू शकतो!
यासोबत सोनीने LF-S50G स्मार्ट स्पीकरसुद्धा सादर केला आहे ज्यामध्ये गूगल असिस्टंट जोडलेला आहे!

Sony Xperia XZ1 

डिस्प्ले : 5.2″ FHD HDR TRILUMINOS™, X-Reality™
मुख्य कॅमेरा : 19MP Motion Eye, 1/2.3” Exmor RS,960 fps सुपर स्लो मोशन व्हिडिओ,
बर्स्ट मोड मध्ये सुद्धा ऑटो फोकस (Autofocus Burst), 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग
फ्रंट कॅमेरा : 13MP, 1/ 3.06”  Exmor RS, 22mm wide angle lens F2.0
ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड ओरिओ 8.0
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835
रॅम : 4GB, स्टोरेज : 64GB
बॅटरी :  2700mAh सोबत Quick Charge 3.0
इतर : Gorilla Glass 5, IP68 वॉटर रेसिस्टन्स, NFC,USB3.1
Sony XZ1 यूट्यूब व्हिडिओ : https://youtu.be/xjZEWLX317w

LG V30 

एलजी (LG) : एलजीने त्यांच्या स्मार्टफोन्समध्ये आणखी एक जबरदस्त फोनची भर घातली आहे. LG V30

डिस्प्ले : 6″ OLED 2,880 x 1,440 FullVision
मुख्य कॅमेरा : 16MP+13MP, 71-degree+120-degree wide-angle lens, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग
f/1.6 असलेला पहिलाच स्मार्टफोन, कमी उजेडात सुद्धा उत्तम फोटो काढेल!
फ्रंट कॅमेरा : 5MP, 90 degree wide angle lens F2.2
ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड नुगट 7.1.2
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835
रॅम : 4GB, स्टोरेज : 64GB
बॅटरी :  3300mAh सोबत Quick Charge 3.0
इतर : Gorilla Glass 5, IP68 वॉटर रेसिस्टन्स,
32-bit Hi-Fi Quad DAC मुळे हेडफोनद्वारे सर्वोत्तम आवाज! 
LG V30 यूट्यूब व्हिडीओ :  https://youtu.be/AHGIBaLuENM

Moto X4

मोटो (Moto) : मोटोरोलाची एकेकाळी प्रसिद्ध असलेली X सिरीज त्यांनी पुन्हा सुरु करत X4 हा स्मार्टफोन सादर केला आहे. नवं डिझाईन, ड्युअल कॅमेरा व अॅमॅझॉन अलेक्सा व्हॉइस असिस्टंट याची काही खास वैशिष्ट्ये

डिस्प्ले : 5.2″ FHD 424 PPI
मुख्य कॅमेरा : 12MP ड्युअल कॅमेरा, f2.0, 8MP ultra-wide angle sensor, 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग
फ्रंट कॅमेरा : 16MP, f2.0 कमी उजेडातसुद्धा चांगल्या सेल्फी
ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड नुगट 7.1
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835
रॅम : 3GB, स्टोरेज : 32GB
बॅटरी : 3000mAh सोबत 15W TurboPower for 6 hours of power in 15 minutes
इतर : Gorilla Glass 5, IP68 वॉटर रेसिस्टन्स, अॅमॅझॉन अलेक्सा व्हॉइस असिस्टंट
Moto X4 यूट्यूब व्हिडीओ :  https://youtu.be/qJBdN4sOlYA

Philips 8602

फिलिप्स : फिलिप्सने त्यांचा पहिला QuantumDot तंत्र असलेला टीव्ही सादर केला असून हा टीव्ही चालू असलेल्या दृश्यानुसार भिंतीवर रंग प्रोजेक्ट करतो! त्यांनी यासोबत हे सुद्धा म्हटल आहे की या Hue Lighting दिव्यांना लवकरच अॅपल होमकीट मध्ये जोडून आयफोनद्वारे नियंत्रित करता येईल! 

सॅमसंग : सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच Galaxy Note 8 सादर केल्यामुळे नवा फोन सादर न करता त्यांनी त्यांच्या स्मार्टवियर उपकरणांमध्ये नवी भर घातली आहे. Samsung Gear Sport हे स्मार्टवॉच, Samsung Gear Fit 2 Pro हा फिटनेस ट्रॅकर, Gear Icon X 2018 earbuds हे हेडसेट सादर केले आहेत!

सोबत एसरने डेस्कटॉप, एससने लॅपटॉप व मिक्स्ड रियालिटी हेडसेट, फिटबिटने स्मार्टवॉच, लेनोवोचा मिक्स्ड रियालिटी हेडसेट आणि पॅनासॉनिकने स्मार्ट स्पीकर सादर केला आहे. हा IFA कार्यक्रम अजूनही सुरू असून येत्या काही दिवसात आणखी काही कंपन्या (नोकिया, एचटीसी) नवे स्मार्टफोन सादर करण्याची शक्यता आहे. त्यानुसार हा लेख अपडेट केला जाईल.

काही दिवसांपूर्वी भारतात Moto G5S Plus सादर झाला असून त्याबद्दल इथे पहा 
कालच झालेल्या घोषणेनुसार आयफोन ८ (iPhone 8) सुद्धा १२ सप्टेंबरला जाहीर केला जाईल!

Exit mobile version