एयरटेलचा १३९९ रुपयात 4G स्मार्टफोन! : कार्बन ए४०

Karbonn A40 Indian 4G Smartphone

रिलायन्स जिओच्या जिओफोन नंतर आता आणखी एक नवा स्वस्त 4G फोन सादर झाला असून जिओफोनला उत्तर म्हणून एयरटेलने हा Karbonn A40 Indian फोन सादर केला आहे. जिओफोन हा फीचर फोन आहे तर एयरटेलचा नवा फोन हा खरा स्मार्टफोन आहे कारण यामध्ये अॅप्स वापरता येतील, गेम्स खेळता येतील, टचस्क्रीन डिस्प्ले अशा सुविधा आहेत. हा फोन भारतीय फोन कंपनी कार्बनने बनवला असून यामध्ये जिओफोनपेक्षा काही सुविधा नक्कीच चांगल्या आहेत!

एयरटेल – कार्बन ए४० फोनच्या सुविधा : Karbonn A40 Indian Specs   
डिस्प्ले : 4 इंची टचस्क्रीन WVGA डिस्प्ले
प्रोसेसर : 1.3 GHz Quad Core Processor
ओएस : अँड्रॉइड नुगट 7.0 
रॅम : 1GB | स्टोरेज : 8GB (32 GB पर्यंत मेमरी कार्डद्वारे)
कॅमरा : 2MP फ्लॅशसोबत  (फ्रंट 0.3MP)
बॅटरी : 1400mAh
नेटवर्क : 4G VoLTE ड्युअल सिम
भाषा : २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो!
कनेक्टिव्हिटी : Wi-Fi, GPS, Bluetooth, USB OTG, FM, 3G and 4G
इतर : गूगल प्ले स्टोअरचा समावेश,  Multi Window, चार रंग

आता याच्या किंमतीबद्दल पाहू
• प्रथम कार्बन A40 विकत घ्यायचा (रु २८९९)
• यानंतर कॅशबॅकमधून १५०० रुपये परत मिळतील यामुळं फोनची किंमत रु १३९९ असल्यासारखी होईल.

यानंतर दरमहिना १६९ च्या रिचार्जवर महिनाभर पूर्ण अमर्याद कॉल्स व रोज 0.5GB 4G इंटरनेट डेटा मिळेल!

• असे १६९ चे रिचार्ज पहिल्या १८ महिने केल्यास (१६९x१८ = ३०४२) मग ५०० रुपये परत मिळणार
• पुढे १६९ चे रिचार्ज नंतरच्या १८ महिन्यात  (१६९x१८ = ३०४२) मग १५०० रुपये परत मिळणार

हे पैसे ग्राहकांच्या एयरटेल पेमेंट बँकमध्ये जमा होतील! याबद्दलच्या अधिक अटींबाबत जाणून घ्या Airtel 4G Phone Terms

हा एयरटेल फोन १३९९ ला असल्यासारखा आहे. मात्र जिओचा शून्य रुपये (खरा रु १५००) म्हटला गेलेला जिओफोन पैसे परत हवे असतील तर नंतर परत करावा लागतो. एयरटेलला तशी गरज नाही. फोन ग्राहकांकडेच राहील. जिओफोन चीनमध्ये तयार करून भारतात विकला जाणार असून एयरटेलचा फोन मात्र कार्बन हि भारतीय कंपनी बनवत आहे.

JioPhone Vs Airtel Kabonn A40

फीचर एयरटेल कार्बन ए४० जिओ फोन
डिस्प्ले 4 इंच टच 2.4 इंच टच नसलेला
प्रॉसेसर 1.3GHz Quad Core 1.2GHz Dual Core
स्टोरेज 8GB 4GB
रॅम 1GB 512MB
ओएस Android Nougat 7.0 KaiOS
अॅप्स Google Play Store (खूप) Jio Store (कमी)
बॅटरी 1400mAh 2000mAh
नेटवर्क ड्युयल सिम (कोणतंही) सिंगल सिम (फक्त जिओ)
एकूण रीचार्ज खर्च ६०८४ (तीन वर्षात) ४५०० (तीन वर्षात)

incoming search terms : Airtel Karbonn A40 Indian 4G Smartphone

Exit mobile version