एयरटेल या टेलीकॉम कंपनीने त्यांच्या सर्व ग्राहकांना Perplexity (पर्प्लेक्सिटी) या AI आधारित आन्सर इंजिनच्या Perplexity Pro चं वर्षभराचं Subscription मोफत देत असल्याचं जाहीर केलं आहे. पर्प्लेक्सिटी प्रो प्लॅनमध्ये इमेज जनरेशन, फाइल विश्लेषण, प्रो सर्चेस, रिझनिंग सर्च मॉडेल्स, रिसर्च मोड, फाइल अनॅलिसिस, अनेक AI मॉडेल्स, Perplexity Labs इत्यादी फीचर्स मिळतात ज्याची वार्षिक किंमत ₹१७००० आहे!
Perplexity Pro म्हणजे काय?
Perplexity हे एक AI-आधारित उत्तरे देणारं सर्च इंजिन आहे, जे तुमच्या कोणत्याही प्रश्नांची सहज, विश्वासार्ह आणि त्वरित उत्तरांसह सोडवतं. हे गूगल सारख्या पारंपारिक सर्च इंजिनपेक्षा वेगळं आहे. Perplexity वापरकर्त्यांना सतत सुधारत जाणार्या AI द्वारे उत्तरे देते आणि प्रत्यक्ष माहितीच्या आधारावर संवाद साधतं. यामुळे कोणताही प्रश्न विचारला की यांचं AI इंटरनेटवर आपल्यावतीने सर्च करून त्याचा अभ्यास करून आपल्या प्रश्नाला योग्य असं रियल टाइममध्ये उत्तर शोधून देतं. Perplexity Pro हे त्यांचं यामध्ये अधिक सोयी देणारं Subscription आहे. याचं सभासदत्व घेतल्यावर
- Research Mode: हे आपल्याला कोणत्याही विषयावर सखोल माहिती शोधण्यास आणि तिचे विश्लेषण करण्यास मदत करते.
- Access to Pro Search Models : वापरकर्त्यांना GPT-4.1, Claude 4.0 Sonnet, Gemini 2.5 Pro यांसारख्या प्रगत एआय मॉडेल्सचा वापर करण्याची सुविधा मिळते.
- Unlimited Files Uploads : तुम्ही तुमच्या फाइल्स अपलोड करून त्याचे विश्लेषण करू शकता किंवा त्यातील माहितीचा सारांश मिळवू शकता.
- Image Generation : एआयच्या मदतीने तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार AI इमेजेस तयार करू शकता.

- Airtel Thanks App (Android किंवा iOS) डाउनलोड करा आणि आपल्या Airtel नंबरने लॉग इन करा (मोबाईल, DTH किंवा ब्रॉडबँड).
- ‘Rewards & OTTs’ (किंवा Claim OTTs) सेक्शनमध्ये जा. तिथे “Perplexity Pro – 12 Months Free” ऑफर सापडेल
- “Claim Now” बटणावर टॅप करा.
- Perplexity खात्यात Google ID, Apple ID किंवा Email ID वापरून साइन इन किंवा साइन अप करा. कोणीही पेमेंट माहिती भरावी लागणार नाही.
- एकदा लिंक झाल्यावर Perplexity Pro सब्सक्रिप्शन आपल्या खात्यावर 12 महिन्यांसाठी सक्रिय होईल