मोटो X4 भारतात सादर : ड्युयल कॅमेरा

Moto X4

मोटोने त्यांच्या प्रसिद्ध एक्स मालिकेत नवा फोन सादर केला असून मोटो एक्स 4 शेवटी आज सादर करण्यात आला. इतर ठिकाणच्या मानाने भारतात हा फोन बराच स्वस्त किंमतीत सादर झाला आहे. हा फोन धातू आणि काच अशा दोन्हीपासून बनलेला आहे. यामध्ये ड्युयल कॅमेरा, जवळपास स्टॉक अँड्रॉइड अनुभव देण्यात आला आहे. IP68 वॉटर रेझिस्टंट हे एक याच वैशिष्ट्य १.५ मीटर पाण्यात बुडला तरी चालेल व धूळ आणि पाण्याचे थेंब यांपासून संरक्षण देईल. हा फोन आज रात्री ११.५९ पासून विक्रीला फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

लिंक : Moto X4 on Flipkart

मोटो X4 सुविधा :
डिस्प्ले : 5.2″ फुलएचडी 424ppi
प्रोसेसर :  Qualcomm Snapdragon 630 64-bit Octa Core 2.2 GHz
GPU : Adreno 508
रॅम : 3GB/4GB स्टोरेज : 32GB/64GB सोबत microSD सपोर्ट
कॅमेरा : 12MP + 8MP ड्युअल कॅमेरा,  F2.0+F2.2
फ्रंट कॅमेरा : 16MP  F2.0
बॅटरी : 3000mAh सोबत 15 W TurboPower सपोर्ट! १५ मिनिटाच्या चार्जवर ६ तास चालेल असा दावा!
ऑपरेटिंग सिस्टिम : स्टॉक अँड्रॉइड 7.1.2 नुगट लवकरच ओरिओ अपडेटसुद्धा!
इतर : टाइप सी TypeC पोर्ट,  फिंगरप्रिंट स्कॅनर, Bluetooth® 5.0, NFC, IP68

किंमत : 3GB+32GB ₹२०९९९
किंमत : 4GB+64GB ₹२२९९९

हा फोन १३ नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

moto X4 launched in India

Exit mobile version