वनप्लस 5T सादर : उत्तम डिस्प्ले, प्रॉसेसर, कॅमेराची जोड!

OnePlus 5T

वनप्लस या कंपनीने आज OnePlus 5T हा नवा स्मार्ट फोन सादर केला असून बेझललेस डिस्प्ले (कडा नसलेला) फोन सादर करण्याच्या स्पर्धेत यांनीही आता उडी घेतली आहे. ड्युयल कॅमेरा, 18:9 अस्पेक्ट रेशो असलेला OpticAMOLED डिस्प्ले, डॅश चार्जिंग (यामुळे चार्जिंग खूपच वेगात होते!), सध्याचा अँड्रॉइडसाठी सर्वोत्तम प्रॉसेसर व जुन्या मॉडेल इतकीच किंमत यामुळे नक्कीच स्मार्टफोन बाजारात हा फोन यशस्वी होईल. 
हा फोन भारतात अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साइटवर २१ नोव्हेंबर दुपारी ४.३० पासून उपलब्ध होईल! 
यानिमित्ताने अॅमेझॉनने काही ऑफर्ससुद्धा जाहीर केल्या आहेत.

वनप्लस ही चीनी कंपनी या इतरांच्या मानाने नव्या असलेल्या कंपनीला अल्पावधीतच बाजारात मोठं यश मिळालं आहे. संस्थापक कार्ल पै याने आजच्या कार्यक्रमात यानिमित्ताने ग्राहकांच्या समुदायाची मोठी मदत झाल्याचे सांगत झालेल्या चुका काबूत करत कशा प्रकारे सुधारणा केली हे स्पष्ट केले. वनप्लस फोन्सचा फायदा हा सुद्धा आहे कि या फोन्ससाठी डेव्हलपरचा मोठा समुदाय (Community) काम करतो आणि सपोर्ट देते.

OnePlus 5T लिंक : http://amzn.to/2AMBPvM

OnePlus 5T सुविधा :
डिस्प्ले : 6-inch AMOLED screen, 18:9 ratio 1080P, 401ppi
कॅमेरा : 16 and 20 MP ड्युयल कॅमेरा Sony IMX 398, f/1.7
फ्रंट कॅमेरा : 16MP, f/2.0
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835
GPU : Adreno 540
रॅम : 6GB/8GB
ऑपरेटिंग सिस्टम : OxygenOS (अँड्रॉइड 7.1.1 नुगट) (लवकरच ओरिओ अपडेट)   
स्टोरेज : 64GB/128GB
बॅटरी : 3300mAh सोबत डॅश चार्जिंग द्वारे वेगात चार्जिंगची सोय
इतर : फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर, Bluetooth 5.0, NFC
किंमत : 64GB : ₹३२,९९९ आणि 128GB : ₹३७,९९९
उपलब्धता : २१ नोव्हेंबर पासून अॅमेझॉनवर दुपारी ४.३०

search terms oneplus 5T review india launch 

Exit mobile version